तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आयुष्यात कधीही रेल्वे स्टेशनवर लिंबू पाणी पिणार नाही
मुंबई : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर उष्णतेने हैराण झालेले मुंबईकर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर असलेल्या स्टॉलमध्ये निंबू सरबत, कोकम असे पेय पितात. पण हे पेय कसे बनवले जातात त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. कुर्ला स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 7 वरील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वे स्टेशनवर पुन्हा कधीही निंबू सरबत पिण्याची इच्छा होणार […]
मुंबई : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर उष्णतेने हैराण झालेले मुंबईकर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर असलेल्या स्टॉलमध्ये निंबू सरबत, कोकम असे पेय पितात. पण हे पेय कसे बनवले जातात त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. कुर्ला स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 7 वरील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वे स्टेशनवर पुन्हा कधीही निंबू सरबत पिण्याची इच्छा होणार नाही.
कुर्ला स्टेशनवर एका प्रवाशाने हा व्हिडीओ ट्विटरवर टाकला होता. रेल्वेकडून याची तातडीने दखल घेण्यात आली. रेल्वे अधिकारी स्टॉलवर गेले आणि त्यांनी पाण्याची तपासणी केली. स्टॉल चालकाचा दोष आढळून आल्यामुळे स्टॉल तातडीने बंद करण्यात आला आहे. शिवाय स्टॉल मालकाचा परवाना रद्द करण्यासाठी आता चौकशी केली जात आहे. लवकरच परवानाही रद्द होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील जवळपास सर्व स्टेशनवर असे स्टॉल आहेत. त्यामुळे इतर स्टॉलवरही रेल्वेकडून आता तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या स्टॉलधारकांवर रेल्वेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या सतर्क प्रवाशामुळे ही घटना समोर आली.
व्हिडीओ पाहा :
VIDEO : प्रवाशांना घाणेरड्या पाण्यात तयार केलेलं लिंबू सरबत, कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 7 वरील व्हिडीओनंतर पोलिसांकडून तातडीने स्टॉल बंद pic.twitter.com/qNrhyMD73i
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2019