मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब होण्याच्या घटना येत्या काही दिवसांत वाढल्या आहेत. त्याविषयी आयुक्तांना सूचना देणार असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुंबई : मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब (Rajesh Tope On Corona Patients Dead Body Disappears Issue) होण्याच्या घटना येत्या काही दिवसांत वाढल्या आहेत. त्याविषयी आयुक्तांना सूचना देणार असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. “मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही, असा प्रश्न नाही. मात्र, काही नियोजनाचा भाग असेल. त्यावर स्वतः आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे, अशा सूचना केल्या जाईल”, असं राजेश टोपे (Rajesh Tope On Corona Patients Dead Body Disappears Issue) यांनी सांगितलं.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयांतून कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर राजेश टोपे म्हणाले, “लोकांशी अत्यंत दयेच्या भावनेतून प्रशासनाने वागलं पाहिजे. प्रत्येक रुग्णालयात एक स्वतंत्र अधिकारी नेमला पाहिजे. 73 खासगी मोठे रुग्णालयांमधील 16 हजार बेड्स आहेत. त्यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. कुणीही जास्त दर घेतले तर त्यावर कारवाई केली जाईल. अत्यंत तत्परतेने चौकशी केली जाईल. कुणीही चुकत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल. मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही, असा प्रश्न नाही. मात्र, काही नियोजनाचा भाग असेल, त्यावर स्वतः आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे”. त्या संबंधिच्या सूचना राजेश टोपे प्रशासनाला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं (Rajesh Tope On Corona Patients Dead Body Disappears Issue).
कोरोना पॉझिटिव्ह सहा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांकडून यादी जाहीर https://t.co/fSkoi8l9zU @KiritSomaiya
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2020
जगाच्या तुलनेत आपल्या देशात कोरोनाचे रुग्ण कमी : राजेश टोपे
“जगाच्या तुलनेत आपला देश कोरोनाच्या बाबतीत खूप बरा आहे. 85 टक्के रुग्ण हे सिमटोमॅटिक आहेत. जगाच्या पातळीवर दर 10 लाख लोकांमागे 5 ते 6 हजार जणांना कोरोनाची लागण होत आहे. त्या तुलनेत देशात दर 10 लाख लोकांमागे 15 ते 16 जणांना कोरोना होत आहे. तर राज्यात दर 10 लाख लोकांमागे 60 ते 70 जणांना कोरोना होत आहे”.
“जगाच्या तुलनेत देशाचा आणि राज्याचा मृत्यू दरही खूप कमी आहे. मात्र, देश आणि राज्याची तुलना करता मृत्यू दरच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. भीती पोटी लोक समोर येत नाहीत, त्यामुळे मृत्यू दर जास्त आहे. प्रभावीपणे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. लोकांना आव्हान आहे की, त्यांनी आपला आजार लपवू नये”.
धारावी आणि मालेगावात परिस्थिती नियंत्रणात येत आहे : राजेश टोपे
“धारावी आणि मालेगावात परिस्थिती नियंत्रणात येत आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कोरोना ग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पण घाबरुन जाण्याची गरज नाही. कायम स्वरुपी लॉकडाऊन ठेवता येत नाही. आता लोकांना कोरोना सोबत राहण्याची सवय घालून घ्यावी लागेल”, असा सल्ला राजेश टोपे यांनी दिला.
Rajesh Tope On Corona Patients Dead Body Disappears Issue
संबंधित बातम्या :
कोरोना पॉझिटिव्ह सहा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांकडून यादी जाहीर
शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोना रुग्ण बेपत्ता, मृतदेह बोरिवली स्टेशनजवळ सापडला