ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग होतंय. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना पुढच्या रांगेत बसवल्यामुळे पानसे नाराज झाले आणि दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले. मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं […]

ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग होतंय. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना पुढच्या रांगेत बसवल्यामुळे पानसे नाराज झाले आणि दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले.

मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. पण स्वतः दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे कुजबुज पाहायला मिळाली. अभिजित पानसे यांना सर्वात पुढचं सीट दिल्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले. अभिजित पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, तर संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

खरं तर अभिजित पानसे हे दिग्दर्शक असण्यासोबतच मनसेचे नेतेही आहेत. मनसे आणि शिवसेनेचा छत्तीसचा आकडा आहे. पण सिनेमासाठी संजय राऊत यांनी अभिजित पानसेंसारख्या अनुभवी आणि कुशल दिग्दर्शकाची निवड केली होती. या सिनेमासाठी मनसेने अभिजित पानसेंना पोस्टरबाजी करत शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर कुठेही संजय राऊत यांचं नाव किंवा फोटो नाही.

ठाकरे सिनेमात बाळासाहेबांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा 25 तारखेला रिलीज होतोय. त्यापूर्वी दिल्ली आणि मुंबईत स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलंय. या स्क्रीनिंगमध्ये सर्वपक्षीय नेते असतील. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.