Corona | घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी द्या, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे (Thane Corona Virus Status). आतापर्यंत 467 कोरोना संशयितांपैकी 72 जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झालं.

Corona | घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी द्या, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 8:26 AM

ठाणे :जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे (Thane Corona Virus Status). आतापर्यंत 467 कोरोना संशयितांपैकी 72 जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झालं. या लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे”, असं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात आता (Thane Corona Virus Status) 395 जणांना देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सध्या 8 असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. तसेच, कोरोनाचा प्रसास रोखण्यासाठी उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी देण्याचं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं आहे.

हेही वाचा : Corona Virus | मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना (Thane Corona Virus Status) आणि सूचनांना 70 ते 80 टक्के नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचं सांगत नियमांचे उल्लंघन करु नका, असे आवाहन नार्वेकर यांनी नागरिकांना केले आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी द्या : जिल्हाधिकारी

“कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे आवश्यक असून उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना घरमालकांनी स्वतःहून सुट्टी द्यावी”, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. “घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये देखील कोरोनाच्या संदर्भात भीतीचे वातारण आहे, त्यामुळे त्यांच्या कामावर याचा परिणाम झाला आहे”, असंही जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगतिलं.

ठाणे जिल्ह्यात 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांना जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीसंदर्भात महत्वाची माहिती दिली. यामध्ये ठाण्यात 1, कल्याणमध्ये 3, उल्हासनगरमध्ये 1, नवी मुंबईत 3 अशी एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या असल्याचे नार्वेकर यांनी सांगतिलं.

“काही ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, अशा ठिकाणी कारवाईची वेळ आणू नका”, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. “सुरक्षेसाठी उद्याने, सार्वजनिक ठिकाणे बंद केली असतानाही या ठिकाणी मुले खेळायला जात असल्याने त्या ठिकाणी गर्दी होते, असं करु नये”, असं आवाहन (Thane Corona Virus Status) त्यांनी नागरिकांना केलं आहे. तसेच, मॉलमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची विक्री बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

तीन दिवस ठाण्यातील बाजारपेठा बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पासून पुढील तीन दिवस शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे. तसेच, गर्दी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी शेअर पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रिक्षा चालकांना शेअर रिक्षा न चालविण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, ठाणे स्टेशन परिसरात कारवाईला सुरुवात केली आहे. रिक्षा बंद करण्याचे कुठलेही आदेश अद्याप नसले, तरी जनजागृतीसाठी ठाणे वाहतूक आणि पोलिसांनी रिक्षाचालकांना स्टेशन परिसरातून शेयर रिक्षा काढण्यास सांगितलं आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात पूर्ण शुकशुकाट दिसून येत आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज : एकनाथ शिंदे

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. खाजगी कंपन्या, उद्योग, आयटी क्षेत्र यांनी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. विलिनीकरणासाठी कोणीही विरोध करता कामा नये. आयसोलेशन वॉर्ड, इमारत, स्वतंत्र जागा अशा ठिकाणी विलिनीकरण करण्यात येत आहे. कोणीही त्यासाठी विरोध करु नये, ही वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते, त्यामुळे स्थानिकांनी यासाठी सहकार्य करावे”, असे आवाहन नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री (Thane Corona Virus Status) एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का

कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींना विनंती

कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यूआधी गोंधळ, पाकिस्तानमध्ये खळबळ

महाराष्ट्रात 25 ठिकाणी धाडी, 1.50 कोटींचे बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स जप्त, प्रशासनाची धडक कारवाई

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.