Thane Lockdown extension | ठाण्यात 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता (Thane Lockdown Extension) आणखी आठ दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

Thane Lockdown extension | ठाण्यात 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?
लॉकडाऊन
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 5:39 PM

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता (Thane Lockdown Extension) आणखी आठ दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ठाण्यात आता रविवार 19 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

याआधी 2 जुलै ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. हे लक्षात घेता हा लॉकडाऊन आठ दिवस वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालावधीत घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्यास मुभा देण्यात आली आहे

कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनबाबत पालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.

कुठे कुठे लॉकडाऊन वाढवला?

  • पुणे-पिंपरी – 13 जुलै ते 24 जुलै
  • ठाणे – 13 जुलै ते 19 जुलै
  • नांदेड – 12 जुलैपासून आठवडाभर

ठाण्यात काय सुरु, काय बंद?

1) आकर्षक आणि नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.

2) इंटरसिटी एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रो सह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही .

3) टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डरअंतर्गत ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाचा खाजगी वाहनांना परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू आरोग्य सेवा आणि या अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.

4) सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरकडून कामकाज बंद असेल. तर बाहेरून येऊन बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.

5) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल. (Thane Lockdown Extension)

6) सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर येतील.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

7) सार्वजनिक ठिकाणी आकर्षक बाबीच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.

8) व्यावसायिक आस्थापना कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकानांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावे.

9) सतत प्रक्रिया आणि फार्मासयुटीकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल .

10) डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.

11) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची

12) वस्तू आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने आस्थापना वरील प्रतिबंधा बँका एटीएम विमा आणि संबंधित बाबी, आयटी आणि आयपीएस टेलिकॉम टपाल इंटरनेट आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे.

13) फक्त घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्यास मुभा (Thane Lockdown Extension) असेल.

संबंधित बातम्या :

Lockdown Extension | ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.