Thane Lockdown Extension | ठाण्यात 2 जुलैपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन
1 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 11 जुलै मध्यरात्री 12 वाजेर्पंयत संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे.
ठाणे : ठाण्यातील लॉकडाऊन वाढण्यात आला आहे (Thane Lockdown Extended From 2nd July). ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज (29 जून) पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यात बैठक झाली. त्यात 1 जुलै रात्री 12 वाजेपासून ते 11 जुलैपर्यंत ठाणे शहरात कडक लॉकडॉऊन असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच ठाण्यात 2 जुलैपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे (Thane Lockdown Extended From 2nd July).
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील केवळ काही हॉटस्पॉट पूर्णपण बंद करुन चालणार नाहीत. उलट त्यामुळे त्या भागातील नागरिक इतर भागात जाऊ शकतात आणि त्या भागातील कोरोनाच्या रुग्ण संख्येतही वाढ होऊ शकते, अशी शंका निर्माण झाल्याने 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 11 जुलै मध्यरात्री 12 वाजेर्पंयत संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे.
या कालावधीत शहरात केवळ मेडिकल, दवाखाने आणि दुध विक्रीची दुकानं सुरु राहणार असून उर्वरीत सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या ठाणे शहरात 8 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 277 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. तसेच, शहरात नवनवीन हॉटस्पॉटही तयार झाले आहेत (Thane Lockdown Extended From 2nd July).
२ जुलैपासून पुढील १० दिवस ठाणे शहरात संपूर्ण लोकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. @TMCaTweetAway
— Thane City Police (@ThaneCityPolice) June 29, 2020
ठाण्यात लॉकडाऊन वाढवण्याची वेळ का आली?
झोपडपट्टी पाठोपाठ अनेक सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदीसह इतर भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार हे निश्चित मानले जात होते. परंतु, सुरवातीला ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करुन त्या भागांमध्येच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस सुरु होती. त्यानुसार, 22 ठिकाणं निश्चित करुन त्या ठिकाणांमधील हॉटस्पॉटही निश्चित करण्यात आले होते.
दरम्यान, त्यानंतर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करुन चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. कारण, या हॉटस्पॉटमधील नागरीक लपूनछपून दुसऱ्या भागात जाऊ शकतात. त्यामुळे इतर भागातही कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे हॉटस्पॉटच नाही, तर संपूर्ण ठाणे शहर बंद करावे, यावर एकमत झाले.
त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर देखील पालिका आयुक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर एकमत झाले. त्यानुसार, 1 जुलैच्या मध्यरात्री 12 ते 11 जुलै मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण ठाणे शहर बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यासंदर्भातील अध्यादेशही काढण्यात आला आहे.
काय-काय सुरु राहणार?
या 10 दिवसांच्या बंदच्या काळात केवळ दुध विक्रीची दुकानं, मेडिकल आणि दवाखाने सुरु राहणार आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या कालावधीत ये-जा करण्याची मुभा असेल. महामार्ग सुरु राहणार आहेत.
काय-काय बंद राहणार?
या कालावधीत शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून, प्रत्येक महत्वाच्या स्पॉटवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. याशिवाय, शहरातील किराणा मालाची दुकानं, इतर साहित्याची दुकानं, भाजी मार्केट हे सर्व देखील या कालावधीत बंद राहणार आहेत. मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक हे देखील बंद असणार आहेत. शिवाय, कोणालाही विनाकारण घरा बाहेर पडता येणार नाही.
“कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे. सुरवातीला हॉटस्पॉट बंद करण्याचा विचार होता. परंतु त्यामुळे पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल असे वाटत नाही. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
ठाण्यात कोरोनाचा कहर वाढताच
ठाण्यात सध्या कोरोनाचे 34 हजार 257 रुग्णा आहेत. यापैकी 14 हजार 355 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 845 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या ठाण्यात कोरोनाचे 19 हजार 922 अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत (Thane Lockdown Extended From 2nd July).
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown Extension | महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला
Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही