मनसेचा दणका, चुकीचा ‘कोरोना’ रिपोर्ट दिलेल्या महिलेचा खर्च ठाणे महापालिका उचलणार

पुढील उपचाराचा सर्व खर्च पालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. (Thane Pregnant woman gets wrong Corona Reports)

मनसेचा दणका, चुकीचा 'कोरोना' रिपोर्ट दिलेल्या महिलेचा खर्च ठाणे महापालिका उचलणार
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 8:31 PM

ठाणे : ठाण्यात 34 वर्षीय गर्भवतीला महापालिकेच्या वतीने चुकीचा ‘कोरोना’चा रिपोर्ट दिल्याचा आरोप मनसेने केला होता. मनसेने दिलेल्या या दणक्यानंतर त्या गर्भवती महिलेला अखेर न्याय मिळाला आहे. या महिलेच्या पुढील उपचाराचा सर्व खर्च पालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. (Thane Pregnant woman gets wrong Corona Reports)

ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या खाजगी लॅबने ‘कोरोना’चा अहवाल चुकीचा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाथ जाधव यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त हेरवाडे साहेब यांची भेट घेतली. मनसेच्या दणक्यानंतर त्या महिलेचा सर्व खर्च पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

ठाण्यातील पाणंदीकर हॉस्पीटल या ठिकाणी तिच्यावर उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. त्यासाठीचा संपूर्ण खर्च ठाणे महापालिकेकडून करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

34 वर्षीय गर्भवती महिलेला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज पाठवण्यात आला आणि तिला सिव्हिल रुग्णालयात जाण्यास सांगितले. सिव्हिल रुग्णालयाने त्यांना नायर रुग्णालयात पाठवले, तर नायर रुग्णालयाने शहानिशा केली, तेव्हा त्यांच्याजवळील पेपरवर संबंधित महिलेचे नाव नसल्याचे दिसले. त्यामुळे रिपोर्ट चुकीचा असल्याचे सांगून नायर हॉस्पिटलने तिला अ‍ॅडमिट न करता परत ठाण्यात पाठवले.

महिलेसोबत तिचे नातेवाईक नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मंगेश जोशी यांनी महिलेला ठाण्यात आणले. ही बाब मनसेच्या लक्षात येताच मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिला पुन्हा दाखल करुन घेतले.

पालिका प्रशासनाने चुकीचा कोरोना अहवाल दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे या गरोदर महिलेचे हाल झाले, तसेच चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित पालिका प्रशासनावर कारवाई करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती.  (Thane Pregnant woman gets wrong Corona Reports)

संबंधित बातम्या : 

ठाणे पालिकेकडून गर्भवतीला चुकीचे ‘कोरोना’ रिपोर्ट, रुग्णालयासाठी दिवसभर वणवण, मनसे मदतीला

Aaditya Thackeray | जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक, अर्भकाला मदतीचा हात, आदित्य ठाकरेंचे वाढदिवशी स्तुत्य पाऊल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.