ठाणे पालिकेकडून गर्भवतीला चुकीचे ‘कोरोना’ रिपोर्ट, रुग्णालयासाठी दिवसभर वणवण, मनसे मदतीला

चुकीचा रिपोर्ट दिल्याने गरोदर महिलेचे हाल झाले, संबंधित पालिका प्रशासनावर कारवाई करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. (Thane Pregnant woman gets wrong Corona Reports MNS Helps to admit in Hospital)

ठाणे पालिकेकडून गर्भवतीला चुकीचे 'कोरोना' रिपोर्ट, रुग्णालयासाठी दिवसभर वणवण, मनसे मदतीला
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 7:53 AM

ठाणे : ठाण्यातील 34 वर्षीय गर्भवतीला महापालिकेच्या वतीने चुकीचा ‘कोरोना’चा रिपोर्ट दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्याने या महिलेला रुग्णालयात दाखल होण्यासाठी वणवण करावी लागली. अखेर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या महिलेला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सहाय्य केले. (Thane Pregnant woman gets wrong Corona Reports MNS Helps to admit in Hospital)

ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या खाजगी लॅबने ‘कोरोना’चा अहवाल चुकीचा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता पालिका स्तरावरही चुकीचा कोरोना रिपोर्ट दिल्याचे वायरल व्हिडिओतून समोर आले आहे.

गर्भवतीला ठाणे आणि मुंबईतील अनेक शासकीय रुग्णालयात अ‍ॅडमिट करुन न घेतल्यामुळे तिला कळा सोसाव्या लागल्या. अखेर एका सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत ही बाब गेल्यानंतर या महिलेच्या चुकीच्या रिपोर्टविषयी विचारपूस करतानाचा व्हिडिओ वायरल झाला.

काय आहे प्रकरण?

34 वर्षीय गर्भवती महिलेला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज पाठवण्यात आला आणि तिला सिव्हिल रुग्णालयात जाण्यास सांगितले. सिव्हिल रुग्णालयाने त्यांना नायर रुग्णालयात पाठवले, तर नायर रुग्णालयाने शहानिशा केली, तेव्हा त्यांच्याजवळील पेपरवर संबंधित महिलेचे नाव नसल्याचे दिसले. त्यामुळे रिपोर्ट चुकीचा असल्याचे सांगून नायर हॉस्पिटलने तिला अ‍ॅडमिट न करता परत ठाण्यात पाठवले.

हेही वाचा : Thyrocare | मनसेने नवी मुंबईत थायरोकेयर लॅब बंद पाडली, चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर आंदोलन

महिलेसोबत तिचे नातेवाईक नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मंगेश जोशी यांनी महिलेला ठाण्यात आणले. ही बाब मनसेच्या लक्षात येताच मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिला पुन्हा दाखल करुन घेतले.

पालिका प्रशासनाने चुकीचा कोरोना अहवाल दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे या गरोदर महिलेचे हाल झाले, तसेच चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित पालिका प्रशासनावर कारवाई करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. आता पालिका याबाबत काय पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. (Thane Pregnant woman gets wrong Corona Reports MNS Helps to admit in Hospital)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.