लॉकडाऊन वाढीला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी वांद्रे येथे हजारोंची गर्दी

मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली आहे (Crowd of Thousands of people in Bandra).

लॉकडाऊन वाढीला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी वांद्रे येथे हजारोंची गर्दी
मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. तसेच गावाकडे परत जाण्यासाठी हट्ट केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी झाली. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता ही गर्दी धोकादायक आहे.
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 7:20 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली आहे (Crowd of Thousands of people in Bandra). नागरिकांकडून आपल्या मूळ गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी केली आहे. त्यामुळे वांद्रेमध्ये भागात बस डेपोजवळ जमा झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे वांद्रे येथील परिस्थिती चिघळल्याचं दिसत आहे.

वांद्रा येथे हजारोच्या संख्येने जमा झालेले कामगार जवळच्याच वस्तीमध्ये राहत होते, अशी माहिती मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून ते येथेच राहत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे प्रचंड गैरसोय आणि हालअपेष्ट होत असल्याची संबंधित कामगारांची तक्रा आहे. हे टाळण्यासाठीच ते त्यांच्या मूळगावी जाण्याचा हट्ट करत आहेत. त्यासाठीच ते बस डेपो परिसरात जमा झाले. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

या परिस्थितीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती किंवा सूरतमधील दंगल यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. स्थलांतरित कामगारांना अन्न-पाणी किंवा निवारा नको आहे, त्यांना घरी परतायचं आहे. कामगारांची घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास केंद्र सरकार सक्षम नसल्याचाच हा परिणाम आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून रेल्वे बंद आहेत. मात्र स्थलांतरित कर्मचारी घरी पोहोचावेत यासाठी, राज्य सरकारने केंद्राकडे आणखी 24 तास रेल्वे चालू ठेवण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. स्थलांतरित कर्मचाऱ्यांसाठी योजना आखण्याची विनंती केली होती.

केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने स्थलांतरितांना त्यांच्या मूळ गावी घरी जाण्याबाबत नियोजन केलं जात आहे. त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सुरक्षितपणे जाता यावं यासाठी प्रयत्न केला जात आहे. आम्ही वारंवार केंद्राकडे यासाठी पाठपुरावा करत आहोत.”

मुंबईत 12 ते 15 कामगारांवर एकाच घरात राहण्याची नामुष्की : बाबा सिद्दकी

या परिस्थितीवर बोलताना काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दकी म्हणाले, “कामगारांना घरी जायचं आहे. मुंबईत ते एका घरात 12 ते 15 जण एकत्र राहत आहेत. मुंबईत राहून सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होतंच आहे. त्यापेक्षा आम्ही घरीच जातो, असं या लोकांचं म्हणणं आहे. या लोकांना आम्ही अन्नधान्य पुरवत आहोत. यावर मार्ग कसा निघेल याबाबत प्रशासनाशी आमचं बोलणं सुरु आहे. आम्ही प्रयत्न करतोय की एखादी अशी जागा निश्चित व्हावी जिथे ते आरामशीर राहू शकतात. या लोकांना समजवण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला. पण ते आम्ही चालत घरी जाणार असं म्हणत आहेत. हे कामगार बंगाल आणि बिहारचे आहेत.”

या लोकांना एकत्रित कुणी आणलं होतं? : आशिष शेलार

भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले, “या ठिकाणी दोन ते अडीच तासापासून मोठा मॉब एकत्रित आला होता. या सर्वांबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस बोलत होते. त्यांना शांतेतचं आवाहन करत होते. मी स्वत: एक तासापासून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व लोक बांद्रा पूर्व, पश्चिम, खार पूर्व या भागातून एकत्र आले होते. प्रश्न हा आहे की या लोकांना एकत्रित कुणी आणलं होतं? याच्यावर सरकारचं लक्ष होतं का? इंटेलिजन्स काय करत होते? त्यांची खदखद का बघितली नाही? या सर्व गोष्टींवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या लोकांनी शांततेने आणि धैर्याने घ्यावं, असं आम्ही आवाहन करतो.”

“वांद्रे स्थानकाबाहेरील गर्दीत बहुसंख्या कामगार बिहारी आणि बंगाली भाषिक”

मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर जमा झालेल्या गर्दीत बिहारी आणि बंगाली कामगारांची संख्या मोठी आहे. ते घरी जाण्यापासून रोखल्यानं निषेध करत आहेत. ते मागील अनेक दिवसांपासून वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात अडकून पडल्याची तक्रार करत आहेत. त्यामुळेच या स्थलांतरीत परप्रांतीय कामगारांनी आपल्या मुळ गावी जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यातील बहुतांश लोक बंगाली आणि बिहारी भाषिक असल्याचं दिसत आहे.

देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आला. याचाही या कामगारांनी निषेध केला आहे. या बिहारी आणि बंगाली परप्रांतीय कामगारांनी आपआपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी केली आहे. या लॉकडाऊन कालावधीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार व जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याचीही तक्रार करण्यात येत आहे. वांद्रा पोलिस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

कोरोनाविरोधात सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहेत. सरकारच्या लॉकडाऊनला देशभरातील सर्वसामान्यांकडूनही बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वांद्रे बस डेपो येथे युपी आणि बंगीलचे नागरिक रस्त्त्यावर आपापल्या राज्यात जाण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या या आंदोलनामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. मुंबईत एकीकडे दररोज कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना दुसरीकडे अशाप्रकारची घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, 21 दिवसात प्रशासनाला कोरानावर ताबा मिळवता आला नाही. देशातील कोरोनाबाधित रुगणांची संख्या 9 हजारांपर्यंत पोहोचली. मुंबईत तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजारच्याही पुढे गेली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट सातवरुन पाचवर, ‘जी दक्षिण’मध्येच तीनशेपार रुग्ण

Lockdown Extension : मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर एकनाथ खडसे म्हणतात….

लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय?

पुण्यात किरकोळ भाज्यांचे दर गगनाला, कोरोना संकट काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री

कोरोना लढ्यासाठी टास्क फोर्स, डॉ. संजय ओक यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Crowd of Thousands of people in Bandra

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.