VIDEO : उल्हासनगरमधील शाळेत विद्यार्थिनींवर स्लॅब कोसळला!
उल्हासगरात शाळेत 10 वीच्या वर्गातील स्लॅबचं प्लास्टर कोसळल्याने तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : उल्हासगरात शाळेत 10 वीच्या वर्गातील स्लॅबचं प्लास्टर कोसळल्याने तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याने प्रकरण उघडकीस आले. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थिनींवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आले.
उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक -1 भागात झुलेलाल ट्रस्टची खासगी शाळा आहे. या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील क्लासरूम क्रमांक 24 मध्ये दहावीचा वर्ग भरतो. आज दुपारच्या सुमारासही या खोलीत 10 चा वर्ग सुरु होता. यावेळी वर्गात एकूण 52 विद्यार्थी होते. वर्गात शिक्षिका शिकवत असताना अचानक खिडकीजवळ स्लॅबचं प्लास्टर कोसळलं. या घटनेने वर्गातील विद्यार्थी घाबरले आणि त्यांची पळापळ झाली. प्लास्टर कोसळल्याने वर्गातील तीन विद्यार्थिनींच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मोठी दुखापत झाली. त्यानंतर विद्यार्थिनींवर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं.
या घटनेनंतर शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबून नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हे प्रकरण बाहेर येऊन शाळेची बदनामी होऊ नये यासाठी शाळा प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मात्र, वर्गात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली.
पाहा या घटनेचा व्हिडीओ :