पहिली, दुसरी रोज 30 मिनिटं, तिसरी ते आठवी 45 मिनिटे 4 सत्रं, शाळांचं वेळापत्रक जाहीर
कोरोनाचा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत (Maharashtra Schools Online Education Timetable).
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता शाळांबाबतही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत (Maharashtra Schools Online Education Timetable). याबाबत सरकारने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
शाळा सुरु करण्यासंदर्भात महाराष्ट्र उप सचिव राजेंद्र पवार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आता सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे 5 दिवस ऑनलाईन शाळा सुरु होणार आहे. यात वर्गनिहाय तासिकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक वर्गांसाठी रोज 30 मिनिटांचा पालकांशी संवाद करण्यात येईल.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
प्राथमिक वर्गांमध्ये पहिली ते दुसरीसाठी दररोज 30 मिनिटांचा विद्यार्थ्यांचा वर्ग असेल, तर 15 मिनिटं पालकांशी संवाद केला जाणार आहे. तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तासिकेचा वेळ वाढवण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांसाठी दररोज 45 मिनिटांची तासिका असेल. याचे एकूण 4 सत्रं होतील. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील दररोज 45 मिनिटांचे 4 सत्रं असणार आहेत.
VIDEO : शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा पातळीवर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती#School #SchoolReopen @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks pic.twitter.com/CXXpm4QkZs
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 23, 2020
वर्गनिहाय तासिकांचं वेळापत्रक
- पूर्व प्राथमिक : रोज 30 मिनिटं, पालकांशी संवाद
- प्राथमिक : पहिली ते दुसरी : रोज 30 मिनिटं, 15 मिनिटं पालकांशी संवाद
- तिसरी ते आठवी : 45 मिनिटांची 4 सत्रं
- नववी ते बारावी : 45 मिनिटांची 4 सत्रं
ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. विद्यार्थी हित व आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे. #OnlineClasses @CMOMaharashtra @scertmaha pic.twitter.com/6lQbVefXLG
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 23, 2020
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “शाळा बंद राहिली तर शिक्षण बंद नको व्हायला. त्यात मुलांचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण ऑनलाईन, ऑफलाईन, गुगल, टेलिव्हिजनच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रयत्न सुरु आहे. यासोबत शाळा सुरु कधी करायच्या याबाबत स्थानिक प्रशासन आणि पालकच यावर निर्णय घेतील. त्यांना तेथील परिस्थितीची अधिक चांगली माहिती असते.”
“एसएससी बोर्डाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक करायला हवं. त्यांनी अशा स्थितीतही बारावीचा निकाल लावला. जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत दहावीचाही निकाल लावण्याचा आपला प्रयत्न असणार आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी गडचिरोली आणि चंद्रपूरमधील शाळा सुरु करण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे. ऑनलाईनसाठीची साधनं नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच शाळेत कोरोना नियंत्रणासाठीच्या सर्व सूचनांचं पालन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा :
उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर, शिवाजी महाराजांवर राजकारण नको : जयंत पाटील
Venkaiah Naidu | ‘जय भवानी, जय शिवाजी’ वादावर व्यंकय्या नायडू यांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Schools Online Education Timetable