एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित नाही, अनिल परब यांचे स्पष्टीकरण
आम्ही गरजेचे लागणारे पैसे सरकारकडे मागत आहोत," असं अनिल परब यांनी यावेळी (Anil Parab on ST workers suspends service) सांगितले.
मुंबई : एसटी महामंडळाने जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली (Anil Parab on ST workers suspends service) आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतला होता. मात्र “एसटीचे कोणतेही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय झालेला नाही,” असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.
“एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत नुकतंच बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनबाबतही चर्चा झाली. सध्या शासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. आम्ही गरजेचे लागणारे पैसे सरकारकडे मागत आहोत,” असं अनिल परब यांनी यावेळी सांगितले.
“गणपतीसाठी कोकणात जाण्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र सध्या आम्ही याबाबतची तयारी करत आहोत,” असेही परब यावेळी म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामूळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @satejp @AUThackeray
— Anil Parab (@advanilparab) July 20, 2020
हेही वाचा – “देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपला वाटते” दानवेंच्या टीकेला काँग्रेसचे उत्तर
भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘अमर-अकबर-अँथनी’ अशा शब्दात महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेला परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. “अमर अकबर अँथनीच सरकार असलं तरी आम्ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलो आहोत,” असा टोला अनिल परब यांनी लागवला.
एसटीच्या दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित
एसटी महामंडळाने जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतला. एसटी बंद असल्याने उत्पन्न रखडलं, त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाणार आहे.
सरकार एकीकडे नोकरीवरुन काढू नका म्हणत असताना एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.
जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. ज्यांचं प्रशिक्षण सुरु आहे, त्या कर्मचाऱ्यांचंही प्रशिक्षण थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं (Anil Parab on ST workers suspends service) आहे.
संबंधित बातम्या :
एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित
Konkan Ganeshotsava | चाकरमान्यांना खुशखबर, गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता