भाजपने फोन टॅप केले, आता समिती चौकशी करेल, चौकशी अधिकाऱ्यांची नावं गृहमंत्र्यांकडून जाहीर

ज्यांची गेल्या पाच वर्षात सत्ता होती, त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप ( HM Anil Deshmukh on Phone tapping) केले होते. त्याबाबतच्या तक्रारीनंतर एक समिती तपासासाठी नेमण्यात आली आहे.

भाजपने फोन टॅप केले, आता समिती चौकशी करेल, चौकशी अधिकाऱ्यांची नावं गृहमंत्र्यांकडून जाहीर
Follow us
| Updated on: Feb 03, 2020 | 5:33 PM

मुंबई : “ज्यांची गेल्या पाच वर्षात सत्ता होती, त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप ( HM Anil Deshmukh on Phone tapping) केले होते. त्याबाबतच्या तक्रारीनंतर एक समिती तपासासाठी नेमण्यात आली आहे. दोन अधिकारी या समितीत आहेत”, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख ( HM Anil Deshmukh on Phone tapping)यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी फोन टॅपिंगप्रकरणाच्या चौकशीची माहिती दिली.

“दोन अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये श्रीकांत सिंग आणि अमितेश कुमार हे दोन अधिकारी आहेत. कोण कोण अधिकारी इस्त्रायलला गेले होते त्याचा तपास होईल. चौकशी समितीला सहा आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहेठ, असं अनिल देशमुख म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत नागपाड्यात आंदोलन सुरु आहे. परवानगी न घेता आंदोलन करण्यात आलं आहे. लवकरात लवकर हे आंदोलन संपवण्यास सांगितलं आहे, असंही गृहमंत्री म्हणाले.

वर्ध्यातील हिंगणघाट इथे प्राध्यापिकेवरील हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. आरोपीवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

भाजपवर फोन टॅपिंगचा आरोप

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. फोन टॅपिंग आणि स्नुपिंग झालेल्या नेत्यांमध्ये शरद पवार, दिग्विजय सिंग या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये इस्त्राईलच्या एनएसओ ग्रुपच्या पिगासिस सॉफ्टवेअर वापरुन 1400 लोकांची हेरगिरी केल्याची माहिती  व्हॉट्सअॅपनं दिली होती. यात 121 भारतीयांचाही समावेश होता. त्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटले. भारतातही राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या 

भाजपच्या काळात विरोधकांच्या फोन टॅपिंगचा आरोप, ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश  

आपके फोन टॅप हो रहे है, भाजपच्या माजी मंत्र्यानेच माहिती दिली, संजय राऊतांचा दावा  

SIT चौकशीच्या मागणीनंतर पाच तासात केंद्राने तपास काढून घेणं संशयास्पद : शरद पवार

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.