अज्ञान, मस्ती की आगाऊपणा, हातावर ‘क्वारंटाईन’चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं!

हातावर विलगीकरण अर्थात ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के (home quarantine stamp passengers deboarded) असूनही अनेकजण रेल्वेने प्रवास करत असल्याचं दिसत आहे.

अज्ञान, मस्ती की आगाऊपणा, हातावर 'क्वारंटाईन'चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं!
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 12:30 PM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, अनेकांना याचं गांभीर्यच नसल्याचं दिसत आहे. कारण हातावर विलगीकरण अर्थात ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के (home quarantine stamp passengers deboarded) असूनही अनेकजण रेल्वेने प्रवास करत असल्याचं दिसत आहे. धक्कादायक म्हणजे आज सकाळीच दुबईवरुन मुंबईला आलेल्या दोघांनी रेल्वेने प्रवास केल्याचं समोर आलं. (home quarantine stamp passengers deboarded)

मुंबईवरुन गुजरातकडे जाणाऱ्या दोघांना विरार स्टेशनवर उतरवण्यात आलं. एक पुरुष आणि एका महिलेचा यामध्ये समावेश आहे. हे दोघेही आज सकाळी दुबईवरुन मुंबईत आले होते. हे दोघेही रेल्वेने गुजरातला जात होते.

ही महिला रिझर्वेशन डब्यात तर पुरुष जनरल डब्यातून प्रवास करत होता. या दोघांच्या हातावरील स्टॅम्प लक्षात आल्यावर अन्य प्रवाशांनी चेन खेचून त्यांना विरार स्टेशनवर उतरवलं आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन, त्यांचं स्क्रीनिंग करण्यात आलं. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येत आहे.

पालघरमध्येही रेल्वेने प्रवास

काही दिवसांपूर्वी पालघरमध्येही असाच प्रकार समोर आला होता. 18 तारखेला संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान (Quarantine stamp Palghar Corona Patient) वांद्र्याहून दिल्लीकडे गरीबरथ एक्सप्रेस या गाडीत चार कोरोना संशयित रुग्ण प्रवास करत होते. G4-G5 या डब्ब्यातून हे रुग्ण प्रवास करत असताना पालघर स्टेशन दरम्यान काही प्रवाशांना शंका आली. तसेच तिकीट तपासनीस यांनीही याबाबतच चौकशी केली. त्यावेळी त्या चौघांच्या हातावर विलगीकरण (क्वारंटाईन) केल्याचे शिक्के होते.

हे चारही जण जर्मनीहून मुंबईत आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून ते चौघे सूरतला जात होते. मात्र त्या दरम्यान प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे या गाडीला पालघर स्थानकावर थांबा देत या संशयित रुग्णांना पालघरला उतरवण्यात आले.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 63 वर

 महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने (corona positive in Maharashtra) वाढली आहे. काल दिवसभरात तब्बल 11 नवे रुग्ण आढळले असून, राज्यातील बाधितांची संख्या तब्बल 63 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच याबाबतची माहिती दिली. “काल दिवसभरात 11 रुग्ण वाढले. यामध्ये 10 रुग्ण मुंबईचे तर 1 पुण्याचा नवा रुग्ण आढळला आहे. यापैकी तिघांना संपर्क आल्यामुळे तर परदेशातून आलेल्या 8 जणांना लागण झाल्याची माहिती” राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित बातमी : 

Reduce AC use | एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला, दिवसभरात 11 नवे कोरोना रुग्ण

 Corona | हातावर विलगीकरणाचे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, पालघरजवळ चेन खेचून ट्रेन रोखली!   

‘ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक’, नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.