मुंबई ते मांडवा फक्त 20 मिनिटात गाठा, जलवाहतुकीतही उबरची एंट्री
मुंबई : कॅब सेवा देणारी उबर आता स्पीड बोट सेवा देणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या जलमार्गावर लवकरच ही सेवा सुरु होणार आहे. ही मुंबईतील सर्वात जलद बोट सेवा असेल. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा हे अंतर 19 किमी आहे. स्पीड बोटने हे अंतर कापण्यासाठी केवळ 20 ते 22 […]
मुंबई : कॅब सेवा देणारी उबर आता स्पीड बोट सेवा देणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या जलमार्गावर लवकरच ही सेवा सुरु होणार आहे. ही मुंबईतील सर्वात जलद बोट सेवा असेल. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा हे अंतर 19 किमी आहे. स्पीड बोटने हे अंतर कापण्यासाठी केवळ 20 ते 22 मिनिटे लागणार असल्याचां सांगण्यात आलंय. एका वेळी 6-8 प्रवासी नेण्याची या बोटीची क्षमता असेल.
1 फेब्रुवारीपासून ही सेवा नियमितपणे सुरु होणार असल्याची माहिती आहे. सुरुवातीला स्पीड बोटचा दर निश्चित असेल. मुंबईकरांकडून मांडवा आणि जवळच्या अलिबागला जाण्यासाठी जहाजाचा पर्याय निवडला जातो. या सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. रस्त्याने जायचं असेल तर हे अंतर 116 किमी असून साडे तीन तासांचा वेळ लागतो.
उबरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर मार्गांवरही स्पीड बोट लाँच केली जाऊ शकते. नवी मुंबईसाठी स्पीड बोटीचा पर्याय उबरच्या विचाराधीन आहे. नवी मुंबईहून दक्षिण मुंबईसाठी जलवाहतूक असावी ही जुनी मागणी आहे. त्यामुळे उबरकडून आता प्रतिसाद मिळेल अशा मार्गांचा शोध घेतला जातोय.
उबरची स्पीड बोट कशी असेल? बूक कशी कराल?
या स्पीडची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 6-8 असेल. यामध्येच उबर XL या प्रकारच्या बोटीमध्ये 10 पेक्षा अधिक प्रवासी बसू शकतात.
स्पीड बोटची सेवा सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत चालू राहिल.
15 मिनिटे अगोदर ही बोट बूक करावी लागेल आणि उबरच्या अॅपवर बुकिंगचा पर्याय उपलब्ध असेल.
मांडव्याला जाण्यासाठी रस्त्याने साडे तीन तास लागतात. या बोटीने जाण्यासाठी 20 मिनिटे लागतील.
या सेवेचे दर उबरकडून लवकरच जाहीर केले जातील.