कुलगुरुंसोबतच्या चर्चेनंतर परीक्षा रद्दचा निर्णय, ATKT विद्यार्थ्यांना ग्रेस गुण, सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य : उदय सामंत

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली (Uday Samant on University Final Exam and UGC).

कुलगुरुंसोबतच्या चर्चेनंतर परीक्षा रद्दचा निर्णय, ATKT विद्यार्थ्यांना ग्रेस गुण, सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य : उदय सामंत
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 3:49 PM

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली (Uday Samant on University Final Exam and UGC). तसेच यावर राज्यातील 13 कुलगुरुंशी चर्चा करण्यात आल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. यावेळी उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना किती दिवस संभ्रमात ठेवायचं असाही सवाल केला. यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असंही त्यांनी नमूद केलं.

उदय सामंत म्हणाले, “अनेक लोकांनी मी यूजीसीला पत्र का लिहिलं असा प्रश्न विचारत आकांडतांडव केलं. मी 17 मे रोजीच यूजीसीला अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत चर्चा केली. मी अनेक तज्ज्ञांशीही बोललो. त्यांनी परीक्षा न घेण्याबाबतच मत नोंदवलं. यानंतर आपतकालीन समितीची देखील बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देखील यूजीसीला पत्र देण्यात आलं.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“यूजीसीने 2 ते 3 दिवसांपूर्वी पत्र पाठवत गाईडलाईन्स पाठवल्या. या गाईडलाईन्समध्ये त्यांनी परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देश दिले. याबाबत मी भूषण पटवर्धन यांची मुलाखत बघितली. त्या मुलाखतीने अजून एक संभ्रम निर्माण झाला आहे. त्या मुलाखतीत भूषण पटवर्धन यांनी पुढचं काय होणार यावर नियोजन न करता पुढे जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही निर्णय घेऊ, असं म्हटलं. यामुळे सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमात ठेवायचं असंच चित्र दिसत आहे,” असंही सावंत म्हणाले.

‘पहिल्या गाईडलाईन्समध्ये परीक्षेबाबत राज्यांना आणि कुलगुरुंना निर्णय घेण्याचे अधिकार’

उदय सामंत म्हणाले, “आमची 6 एप्रिलला बैठक झाली. या बैठकीत कोविडच्या प्रादुर्भावामुळे काय होणार आहे? याची माहिती घेण्यासाठी 13 कुलगुरुंच्या बैठकीत एक समिती स्थापन केली. भविष्यात परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत कुलगुरुंनी शासनाकडे शिफारस करावी, असं आम्ही ठरवलं. याशिवाय उपसमितीच्या बैठका देखील 23 आणि 24 एप्रिलला झाल्या. 13 कुलगुरुंच्या बैठकीत 6 जणांची उपसमिती ठरली. त्यांचे समन्वयक मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांना निवडण्यात आले.”

“या समितीने काम करायला सुरुवात केली तेव्हा 29 एप्रिलला पहिल्यांचा यूजीसीच्या गाईडलाईन्स आल्या. पहिल्याच गाईडलाईन्समध्ये प्रत्येक राज्यामध्ये असलेली कोविडची परिस्थिती पाहून तेथील शासनाने निर्णय घेण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार सरासरीने गुण द्यायचं, पुढच्या वर्षात घ्यायचं की नाही, हे विद्यापीठाने ठरवण्यास सांगण्यात आलं,” असंही सामंत म्हणाले.

हेही वाचा :

Exam Controversy | परीक्षा रद्द झाल्याच पाहिजे, मंत्री उदय सामंत यांची मागणी

UGC चा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा, सप्टेंबरपर्यंत परीक्षा शक्य नाही : उदय सामंत

Uday Samant on University Final Exam and UGC

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.