वसई-विरारमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन
वसई-विरारमध्ये कोरोना काळात कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे (Vasai Virar Clean Up employee suspend).
वसई : वसई-विरारमध्ये कोरोना काळात कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे (Vasai Virar Clean Up employee suspend). वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरण डी यांनी ही कारवाई केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे इतर कर्मचारी धास्तावले आहेत (Vasai Virar Clean Up employee suspend).
सोनू सरबटा, चंदू सोलंकी असे निलंबन केलेल्या दोन कायमस्वरूपी सफाई कामगारांची नावं आहेत. महानगरपालिकेने अधिग्रहित केलेल्या रिद्धी विनायक हॉस्पीटल, नालासोपारा (प.) या रुग्णालयात या दोघांची नियुक्ती केली होती.
सफाई कर्मचारी यांच्या कामचुकारपणामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे आयुक्त यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तडकाफडकी दोघांचेही काल 28 ऑगस्ट रोजी निलंबन केले आहे.
नुकतेच रायगडमध्ये 31 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आले आहे. कोरोना काळात कामावर येण्यास नकार दिल्यामुळे एसटी महामंडळाकडून ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यासोबत नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
वसईतील प्रसिद्ध डॉक्टरचा ‘कोरोना’ने मृत्यू, बविआचे माजी नगरसेवक डॉ. हेमंत पाटील कालवश
वसईत कोरोना रुग्णांची लूट, 17 दिवसांचे बिल 4 लाख 72 हजार, नातेवाईकांचा आरोप