मध्यमवर्गीयांच्या घरातील बजेट कोलमडणार; बाजारपेठेतील भाजीपाल्याचे दर कडाडले

परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले आहे

मध्यमवर्गीयांच्या घरातील बजेट कोलमडणार; बाजारपेठेतील भाजीपाल्याचे दर कडाडले
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 10:32 AM

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये होणारी भाजीपाल्याची आवक लक्षणीयरित्या घटली आहे. परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले आहे. या सगळ्यामुळे आता सामान्य घरातील बजेट कोलमडताना दिसत आहे. सामान्य घरातील गृहिणी या वाढीव खर्चामुळे मासिक खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा या चितेंत दिसून येत आहे. (Vegetable price increase in Maharashtra)

घाऊक आणि किरकोळ दोन्ही बाजारपेठांमध्ये भाववाढ दिसून येत आहे. पालक ,मेथी ,कोथिंबीर हिरव्या मिरच्या ,टोमॅटो ,आणि मटार दुप्पट भावाने विकले जात आहेत. भाज्यांसोबतच डाळींचे भाव देखील वाढले आहेत . लॉकडाऊन आणि कोरोनाचा संकट असताना भाज्यांचे आणि डाळींचे दर वाढल्याने विक्रेते आणि ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

भाजीपाला         घाऊक बाजार              किरकोळ बाजारातील दर मटार                     150 ते 160                             160 ते 180 फरसबी                  80 ते  90.                             80 ते 100 फ्लॉवर                  80 ते 90.                                   80 ते 100 शेवगा                   80 ते 90.                                    80 ते 100 कोबी                    40 ते 60.                                     40 ते 70 भेंडी                     50 ते 60.                                       50 ते 80 गवार                    90 ते 100.                                      90 ते 110 टोमॅटो                     32                                                 50 ते 60 बटाटे                  32                                                        40 कोथिंबीर            30                                                   50 ते 60

डाळ.               घाऊक बाजारपेठ                 किरकोळ मसूर डाळ            63 ते 68                         80 ते 90 मूंग डाळ                 110                                  120 तूर डाळ                  120                                 130 उडीद डाळ               130                                110

नांदेडमध्ये तुटवड्यामुळे भाजीपाला महागला नांदेडमध्ये सध्या भाजीपाल्याने शंभरी पार केलीय. सगळ्याच भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य त्रस्त झालेयत. अतिवृष्टीमुळे बहुतांश भाजीपाला शेतातच सडून गेलाय, रेल्वेसेवा बंद असल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी होतेय तर इंधनाच्या दरवाढीने वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम भाजीपाला महागण्यास कारणीभूत ठरलाय. तसेच बहुतांश धरणे भरल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला सोडून रब्बी हंगामाची कास धरलीय. त्यातून भाजीपाल्याचे क्षेत्र कमी झाल्याचा परिणाम बाजारात दिसून येतोय. भाज्यांसोबत कांदे, बटाटे, लसूण , आले आणि अंडी याचेही भाव वाढलेत.

संबंधित बातम्या:

फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला

परतीच्या पावसामुळे 36 हजार हेक्टरवरील पीक पाण्यात, शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू

राज्यात भाजीपाला महागला, पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ

Chandrapur Lockdown | रिक्षेतच भाजीपाला विक्री, चंद्रपुरात रिक्षाचालकाची हुशारी

(Vegetable price increase in Maharashtra)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.