कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसमोरची पहिली प्रतिक्रिया होती.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची अमंलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून नऊ तास चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर घरी गेलेल्या राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसमोरची पहिली प्रतिक्रिया होती.
तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी 11.30 वाजता सुरु झालेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत चालली. चौकशी संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर आले आणि गाडीत बसले. राज ठाकरेंचे कुटुंबीय जवळपास दोन तासांपासून बाहेर वाट पाहत होते. सकाळी राज ठाकरेंना सोडण्यासाठी आलेले कुटुंबीय बाजूच्याच हॉटेलमध्ये थांबले.
9 नंबरची गाडी, 9 तास चौकशी आणि 9 वाजता घरी
राज ठाकरे सकाळी त्यांच्या 9 या लकी क्रमांकाच्या गाडीत बसून ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले. यानंतर त्यांची चौकशीही 9 तास चालली आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते रात्री 9 वाजता घरी पोहोचले.
पाहा व्हिडीओ :