बीएमसीच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी व्हा, सिनेकलाकार, साहित्यिकांचं आवाहन
कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात सुरु असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेला आता सिनेकलाकार आणि साहित्यिकांचाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे (Writer Actor support My Family My Responsibility campaign of BMC ).
मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात सुरु असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेला आता सिनेकलाकार आणि साहित्यिकांचाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे (Writer Actor support My Family My Responsibility campaign of BMC ). या सर्वांनीच मुंबईकरांना ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊन सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. मागील 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ अक्षरश: झोकून देत अखंड काम करत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना नियंत्रणाच्या प्रयत्नांना मुंबईकरांनी पूर्णपणे साथ द्यावी, असं आवाहन विविध सिनेकलाकार साहित्यिक कलावंत यांनी नागरिकांना केलंय.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू केलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आलीय. यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, त्याच वेळी कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन जीवनात नवीन बदलांचा स्वीकार करणे गरजेचं आहे. मास्कचा योग्य वापर नियमितपणे करणे, हातांची स्वच्छता राखणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा उपयोगही आवश्यक असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. कोणत्याही स्थितीत कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी आणि नव्या जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीमही राबवण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्याने एक कुटुंब म्हणून जबाबदारी उचलणे आवश्यक असल्याचे सांगत प्रसिद्ध अभिनेता @swwapniljoshi यांनी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे.@mybmcWardRC#MyFamilyMyResponsibility#NaToCorona pic.twitter.com/Mt9jDwDnRD
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 4, 2020
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग माझे कुटुंब-माझी जबाबदारी उपक्रम मुंबईतील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आरोग्य स्वयंसेवकांची पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची माहिती घेणे, त्यांचे शारीरिक तापमान आणि प्राणवायू पातळी तपासणी करणे, आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींची माहिती देणे ही कामे या पथकांकडून करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून विविध मान्यवर, सिनेकलाकार, कलावंत आणि लोकप्रतिनिधी यांच्या घरी पोहोचलेल्या या पथकांचे विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.
“आरोग्य सेवा आणि नागरी सेवा-सुविधांशी संबंधित दैनंदिन कामं करताना कोरोना विषाणू संबंधित कामकाजाचा अतिरिक्त भार महानगरपालिका प्रशासन पूर्ण ताकदीने सांभाळत आहे. आरोग्य यंत्रणेने तर पावसाळी आजारांशी संबंधित उपचारांमध्ये देखील कमतरता ठेवली नाही. सोबत क्षयरोग निर्मूलन अभियान, पोलिओ लसीकरण मोहीम अशा इतर नियमित उपक्रमांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासह माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम देखील राबवली जात आहे,” असा दावा बीएमसीने केला आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर, स्वप्नील जोशी, शिवाजी साटम, संजय मोने, विनय येडेकर, विख्यात अभिनेत्री नीना कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, वर्षा उसगावकर, साहित्यिक व प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर, जाहिरात विश्वातील प्रसिद्ध ॲडगुरु प्रल्हाद कक्कर, अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे सर्वांनी पालन करावे. मुंबईकरांचे आरोग्य सेवेमध्ये अखंड योगदान देत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे आणि माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करावी, असं या मान्यवरांनी नमूद केलं आहे.
संबंधित बातम्या :
सोसायटींपेक्षा झोपडपट्टीत ॲन्टीबॉडीजचं प्रमाण सर्वाधिक, ‘सीरो’ सर्वेक्षणाचा अहवाल
Writer Actor support My Family My Responsibility campaign of BMC