इंडिगो आणि अकासाच्या 10 विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Bomb Threat : विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पुन्हा एकदा अशीच धमकी देण्यात आली. 10 वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता.

इंडिगो आणि अकासाच्या 10 विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
बॉम्ब धमकीने खळबळ
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 3:21 PM

विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी अजून एकदा अशा प्रकारची धमकी येऊन धडकली. 10 वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मुंबईतून इस्तांबूलकडे रवाना होत असलेल्या फ्लाईट 6E 17 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली. प्रवाशांची सुरक्षा आणि चालक दलाची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा यंत्रणेसोबत काम करत आहोत आणि सावधगिरीने पावलं टाकत असल्याची माहिती इंडिगोने दिली आहे.

एकाच आठवड्यात 70 धमक्या

या सोमवारपासून आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांना जवळपास 70 वेळा बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे. या सर्व धमक्या अखेर फोल ठरल्या आहेत. या धमक्यामुळे सुरक्षेसाठी मार्ग बदलण्यात आला. अथवा त्यांच्या उड्डाण वेळेत बदल करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या धमक्याविषयी मोठा निर्णय घेण्यासाठी पावलं टाकली आहे. अशा धमकी देणाऱ्या नागरिकांना भविष्यात विमानाने प्रवास करता येणार नाही यासाठी एक खास सूची तयार करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यांना नो-फ्लाई सूचीत, यादीत टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यात असा त्रास देणाऱ्या प्रवाशांचा आणि नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यात विमानाने प्रवास करता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

विमानाचा मार्ग बदलावा लागला

काल बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दिल्लीहून लंडनला जाणारे विस्तारा विमान फ्रँकफर्टच्या दिशेने वळवण्यात आले. विमान कंपनीने ही माहिती दिली होती. आज सकाळी विमान कंपनीने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार विमान फ्रँकफर्ट विमानतळावर उतरवण्यात आले. त्याठिकाणी सर्व तपासणी करण्यात आली. सुरक्षा यंत्रणेकडून परवानगी मिळाल्यानंतर हे विमान पुढील दिशेने प्रवासाला निघाले. तर शुक्रवारी बेंगळुरू येथून मुंबईसाठी निघालेल्या विमान QP 1366 मध्ये असाच प्रकार पाहायला मिळाला होता. या आठवड्यात 70 वेळा विविध विमान कंपन्यांना बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.