Heat Wave : देशात उष्णतेची लाट, वाढत्या गर्मीसह लोडशेडिंगचे संकट, अनेक राज्यात वीज खंडित होण्याच्या मार्गावर? काय आहेत याची 10 कारणं

ज्या राज्यांना हवामान विभागाने आधीच उष्णतेच्या लाटेची सुचना दिली आहे त्याच राज्यात विजेची मागणी ही अधिक वाढली आहे

Heat Wave : देशात उष्णतेची लाट, वाढत्या गर्मीसह लोडशेडिंगचे संकट, अनेक राज्यात वीज खंडित होण्याच्या मार्गावर? काय आहेत याची 10 कारणं
उष्णतेची लाटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 2:09 PM

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात उष्णता (Heat) वाढताना दिसत आहे. तर देशातील अधिकतम राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. तर ज्या राज्यांत पाऊस होत नाही तेथे तर परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच हवामान विभागाने (Meteorological Department) देशातील काही राज्यात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच नागरिकांना अधिक सतर्क राहायला सांगितलं आहे. त्यातच आता अनेक राज्यात सुरू असणाऱ्या विजेच्या (Electricity) संकंटामुळे आगीत तेल ओतण्यासारखी स्थिती झाली आहे. तर काही राज्यांपुढे कोळसा संकंट उभे असल्याच्या बातम्या आल्या आहेत. ज्यामुळे तेथे विजेचे संकंट आणखीन तीव्र झाले आहे. तसेच विजेचे संकंट आता दिल्लीवर ही दिसत असून राज्याचे ऊर्जा मंत्री सत्यंद्र जैन यांनी तात्काळ बैठक घेतली. तसेच त्यांनी केंद्राकडे कोळसा पाठवावा अशी मागणी केली. त्यातच राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात आणि हरियाणासह अनेक राज्यात सुर्य उष्णाता ओकत आहे. त्यातच या राज्यांना कोळशा तुटवड्यामुळे लोडशेडिंगचाही सामना करावा लागत आहे.

काय आहेत याची 10 कारणं

1. वाढत्या गर्मी आणि कोळशाच्या कमीमुळे दिल्लीतील मेट्रो आणि रूग्णालयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गुरूवारी आलेल्या एका माहितीनुसार दादरी आणि ऊंचाहार येथील विजनिर्मिती स्टेशनमधील वीज निर्मिती थांबल्यामुळे दिल्लीतील मेट्रो आणि रूग्णालयांसह अनेक ठिकानांची वीज २४ तास खंडित होऊ शकते.

2. त्यातच दिल्लीत मागील काही दिवसांपासून तापमान हे 40 डिग्रीपेक्षाही जादा नोंदवले गेले आहे. तर बुधवारी पारा 44 डिग्रीप्रर्यंत गेला होता. त्यातच हवामान विभागाने सांगितले होते की दिल्लीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर पावसाची कोणतीही शक्यता नाही.

हे सुद्धा वाचा

3. तर याच्याआधीच हवामान विभागाने देशातील राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांना उष्णतेच्या लाटेवरून ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर हरियाणाच्या गुरूग्राममध्ये एप्रिलमध्ये पहिल्यांदाच 45.6 डिग्री तापमान नोंदविण्यात आलं आहे.

4. राजस्थानमध्ये तर विजेची मागणी ही वाढतच आहे. तर राज्याने सामान्यांचा विचार करत राज्यातील कारखान्यांची वीज कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

5. तसेच ज्या राज्यांना हवामान विभागाने आधीच उष्णतेच्या लाटेची सुचना दिली आहे त्याच राज्यात विजेची मागणी ही अधिक वाढली आहे.

6. त्यात गुजरातमध्ये सध्या गर्मीमुळे वातावरण तंग आहे. येथे अधिकाऱ्यांना वाढत्या गर्मी आणि विजेच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तर जनतेच्या रोषालाही सामोरं जाव लागत आहे. त्यातच गुजरात आरोग्य विभागाचे सचिवांनी, राज्यातील रूग्णालयांना उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी वॉर्ड तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

7. तर भयावह बाब म्हणजे एएफपी च्यानुसार २०१० पासून आतापर्यंत ६००० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

8. तर देशात वाढत्या गर्मी आणि उष्णतेच्या लाटेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेतावनी दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले, देशात तापमान वाढत आहे आणि हे वेळेच्या आधी होत आहे. त्यातच आपण अनेक ठिकाणी आगीच्या घटना पाहत आहोत. त्यात इमारती, रूग्णालय आणि जगलांचाही समावेश आहे.

9. त्यातच देशातील शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. लोडशेडिंगमुळे त्यांना शेताला पाणी देता येत नाही.

10. तर पंजाबचे ऊर्जामंत्री हरभजन सिंग यांनी म्हटले होते की, मागील वर्षीपेक्षा यावेळी विजेची मागणी ही 40 टक्क्यांनी वाढली आहे. तर विरोधी पक्षांनी आरोप केला की, राज्यात 10 ते 13 तास लोडशेडिंग केली जात आहे. तेही ग्रामीणभागात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.