एका मिनिटात 1000 लिटर ऑक्सिजन, ‘तेजस’च्या तंत्रज्ञानाने होणार ऑक्सिजनची निर्मिती; वाचा सविस्तर
या संकटाच्या परिस्थितीत भारताला ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याचा नवीन मार्ग सापडला आहे. या नवीन आणि अनोख्या मार्गाने तेजस फायटर जेटमध्ये ऑक्सिजन तयार करणाऱ्या संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. (1000 liters of oxygen per minute, Tejas technology will produce oxygen; Read detailed)
नवी दिल्ली : महामारीच्या दुसर्या लाटेने देशात खळबळ उडाली आहे. कोरोना महामारीमुळे भारत पुन्हा एकदा धोकादायक स्थितीत आला आहे. देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. ऑक्सिजन अभावी लोकांना जीव गमवण्याची वेळ आली आहे. बर्याच भागांमध्ये, रुग्णालय ऑक्सिजन आणि बेड्स नसल्यामुळे लोक झगडत असल्याचे दिसून येते. या संकटाच्या परिस्थितीत भारताला ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याचा नवीन मार्ग सापडला आहे. या नवीन आणि अनोख्या मार्गाने तेजस फायटर जेटमध्ये ऑक्सिजन तयार करणाऱ्या संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. (1000 liters of oxygen per minute, Tejas technology will produce oxygen; Read detailed)
एका मिनिटात 1000 लिटर ऑक्सिजन
कोविड -19 युद्धात त्या संरक्षण तंत्रज्ञानाचा प्रयोग केला जाईल, जे ऑन बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम (ओबीओजीएस) म्हणून ओळखले जाते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तेजस फायटर जेटमध्ये ऑक्सिजन पुरविला जातो. या तंत्राच्या सहाय्याने तयार होणाऱ्या ऑक्सिजनचा उपयोग नागरी हेतूसाठी केला जाईल. या ऑक्सिजन निर्मिती प्लान्टच्या मदतीने, दर मिनिटाला एक हजार लिटर ऑक्सिजन तयार केले जाऊ शकते.
ओबीओजीएस(OBOGS) तंत्रज्ञान म्हणजे काय?
डीआरडीओच्या म्हणण्यानुसार ओबीओजीएस(OBOGS) म्हणजे लाईफ सपोर्ट सिस्टम जी उंचावर आणि हाय स्पीड फायटर एअरक्राफ्टमधील एअरक्रूला संरक्षण पुरविते. ओबीओजीएसच्या मदतीने लिक्विड ऑक्सिजन सिस्टम म्हणजेच एलओएक्स(LOX)च्या जागी विमानाच्या इंजिनमधून निघणाऱ्या हवेचा प्रयोग करुन आणि अणूंना एक प्रकारची आण्विक चाळणी(molecular sieve), ज्याला जोलाइट म्हणतात, त्याला प्रेशर स्विंग एडसॉरप्शन(PSA)तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगळे करते. या प्रणालीमध्ये ऑक्सिजनसह येणाऱ्या दोन आण्विक चाळणी(molecular sieve)चे दोन थर असतात. या मदतीने एअरक्रूला लगातार ऑक्सिजन पुरविला जातो.
उत्तर प्रदेशकडून 5 प्लांट्सची मागणी
मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशन (डीआरडीओ)ने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. हे तंत्रज्ञान खासगी उद्योगात हस्तांतरित केले गेले आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेश सरकारने अशा प्रकारच्या 5 प्लांट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. मंगळवारी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात याला दुजोरा देण्यात आला आहे. डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी संरक्षण मंत्रालयाला सांगितले की. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी अशा इतर प्लांट्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून पुरवठा केला जाऊ शकतो.
रुग्णांसाठी डीआरडीओ(DRDO)चे मोठे पाऊल
रेड्डी यांच्याकडून सियाचीनसारख्या ठिकाणी तैनात असलेल्या सैन्यासाठी वापरली जाणाऱ्या पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली सादर करण्यात आली आहे. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, यावेळी कोविड -19 ची जी परिस्थिती आहे, त्यात रुग्णांची स्थितीही त्या सैनिकांसारखीच आहे. डीआरडीओला आशा आहे की, लवकरच SpO2 अर्थात Blood Oxygen Saturation वर आधारीत हे उत्पादन बाजारात उपलब्ध होईल.
सेवानिवृत्त सैनिकांची मदत घेणार
डीआरडीओ चीफच्या वतीने राजनाथ सिंह यांना असेही सांगण्यात आले आहे, की नवी दिल्ली येथील कोविड -19 केंद्रात बेड्सची संख्या 500 पर्यंत वाढवण्याची योजना डीआरडीओने आखली आहे. असाधारण पाऊल उचलत संरक्षणमंत्र्यांनी लसीकरण झालेल्या निवृत्त सैनिकांची मदत घेण्याचा असा सल्ला दिला होता. या लोकांना सध्याच्या या परिस्थितीत नागरी प्रशासन आणि राज्य सरकारांच्या मदतीसाठी घेतले पाहिजे. (1000 liters of oxygen per minute, Tejas technology will produce oxygen; Read detailed)
ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पालिका सरसावली; चार सूत्री अॅक्शन प्लान तयारhttps://t.co/bYUDr2GBWo#OxygenCylinders | #OxygenShortage | #mumbai | #bmc
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2021
इतर बातम्या
Ajay Devgn | अजय देवगणचा आणखी एक धमाका, ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ ओटीटीवर प्रदर्शित होणार!
Vikas Bank PO recruitment 2021: विकास बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर