11,000 व्होल्टच्या हायटेंशन वायरचा DJ ला झटका, लग्नाच्या वरातीत किंचाळ्या, हाहाकार आणि सन्नाटा

स्थानिक लोकांनी आरोप केला आहे की हायटेंशन तारांना उंच करण्याची मागणी वीजमंडळाला केली होती. परंतू वीजमंडळाने या लटकत्या तारांना उंच केले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भरवारी वॉर्ड क्र.7 चे नगरसेवक वीरेंद्र गौतम यांनी सांगितले की अनेक वेळा तक्रारी करून वीज मंडळाचे कर्मचारी केवळ पाहून गेले परंतू वीजेच्या तारांना उंच केले नाही.

11,000 व्होल्टच्या हायटेंशन वायरचा DJ ला झटका, लग्नाच्या वरातीत किंचाळ्या, हाहाकार आणि सन्नाटा
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 6:28 PM

उत्तर प्रदेश | 3 मार्च 2024 : उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात लग्नाची वरात चालू असताना मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे लग्नघरातील आनंदावर विरजण पडले. लग्नाची वरात सुरु असताना डीजेच्या तालावर सर्वजण बेधुंद होऊन नाचत असताना अचानक डीजेसह नवरदेवाच्या मित्रासह तीन जणांना 11,000 व्होल्टच्या हायटेंशन वायरच्या वीजप्रवाहाचा प्रचंड शॉक लागला. त्यामुळे दोन सख्या भावांसह तीन जणांना रुग्णालयात डॉक्टरांना तपासून मृत घोषीत केले. त्यामुळे लग्नघरात मातम पसरला. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ही घटना भरवारीच्या वॉर्ड क्र.7 रामनगर ( उसरा ) येथील आहे. कौशांबी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुल्हनियापूर गावातील सम्मारी लाल प्रजापती यांचा मुलगा पिंटू प्रजापती याचे लग्न अमृता हिच्याशी योजले होते. शनिवारी लग्नाची वरात उसरा पोहचली तेव्हा सर्व वऱ्हाडी नाश्ता झाल्यानंतर डीजेच्या तालावर बेधुंद नाचत होते. वधूच्या घरापासून वरात 400 मीटर अंतरावर असताना गावाला वीज पुरवठा करणाऱ्या खांबांची 11,000 व्होल्टची वीजवाहीनीचा स्पर्श डीजेला झाला. त्यामुळे वीजेचा जोरदार झटका बसून वराचे मित्र राजेश कुमार (20 ), रवी कुमार ( 22 ) , पिता रामभवन ( दोन सख्खे भाऊ ) आणि डीजेचा कर्मचारी सतीश कुमार ( 30 ) यांचा जागीच मृत्यू झाला.

विद्युत विभागाकडे वारंवार तक्रार

या अपघातानंतर घटनास्थळी मोठी अफरातफर माजली. डीजेला कसेतरी बाजूला करुन तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉक्टरांना त्यांना मृत घोषीत केले. यानंतर नातेवाईकांनी अक्षरश: हंबरडा फोडला. पोलिसांनी तिघांच्या मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी डीएसपी अवधेश विश्वकर्मा यांनी सांगितले की यावेळी पाऊस पडत असल्याने डीजे भिजू नये म्हणून त्याच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली होती. जेव्हा डीजे सुरु होता तेव्हा छत्रीचा स्पर्श खाली लटकत्या तारांना झाला असावा, त्यामुळे सतीश जखमी झाला. त्यामुळे साऊंड सिस्टीमच्या बाजूला उभे असलेले दोन अन्य व्यक्ती भाजून जखमी होत बेशुद्ध पडले. रुग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.