UP Tatto : धक्कादायक ! टॅटू काढल्यानंतर ताप आणि अशक्तपणा जाणून लागला, डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली तर एचआयव्हीची बाधा झाल्याचे उघड

टॅटू काढल्यानंतर या सर्वांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. या लोकांनी औषध घेतले पण तरीही बरे वाटत नव्हते. यानंतर या लोकांनाही कळले की, त्यांचे वजन झपाट्याने कमी होत आहे.

UP Tatto : धक्कादायक ! टॅटू काढल्यानंतर ताप आणि अशक्तपणा जाणून लागला, डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली तर एचआयव्हीची बाधा झाल्याचे उघड
वाराणसीत टॅटू काढल्यानंतर 12 जणांना एचआयव्हीची बाधाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 3:11 PM

उत्तर प्रदेश : सध्या अंगावर दर्शनी भागावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू (Tattoo) गोंदवण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात विशेषतः तरुण वर्गात आहे. त्यामुळे जागोजागी असे टॅटू काढणारे दुकान मांडून बसल्याचे दिसतात. तुम्हालाही टॅटू काढायचा असेल किंवा टॅटू काढण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही बातमी काळजीपूर्वक वाचा. उत्तर प्रदेशातील वाराणसी (Varanasi)मध्ये अशाच एका जत्रेत टॅटूवाल्याकडून टॅटू गोंदवून घेणे 12 जणांना तरुण-तरुणींना महागात पडले आहे. टॅटू गोंदवल्यानंतर या सर्वांना एचआयव्ही (HIV)ची बाधा झाली आहे. एचआयव्हीची लागण झालेल्या 12 जणांमध्ये दहा मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. टॅटू गोंदवून एचआयव्ही बाधित झाल्याची बातमी समजताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅटू काढल्यानंतर तब्येत बिघडली

सर्व बाधितांची पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर एचआयव्हीची पुष्टी झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एकाच सुईने गोंदवल्यामुळे या सर्वांमध्ये एचआयव्ही संसर्ग पसरला आहे. अँटी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट सेंटरच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. या सर्व मुला-मुलींनी नुकतेच टॅटू काढले आहेत. टॅटू काढल्यानंतर या सर्वांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. या लोकांनी औषध घेतले पण तरीही बरे वाटत नव्हते. यानंतर या लोकांनाही कळले की, त्यांचे वजन झपाट्याने कमी होत आहे. या सर्व लोकांची हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली असता त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याची पुष्टी झाली. या सर्वांनी कुठल्यातरी जत्रेतून टॅटू बनवून घेतल्याचे कळते.

अनेकदा टॅटू काढणारे एकाच सुईचा वापर करतात

काही लोक अनेकदा जत्रेत किंवा रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्याकडून टॅटू काढून घेतात. अनेक वेळा टॅटू बनवणारे सुईच्या किंमतीमुळे सुई बदलत नाहीत आणि एकाच सुईने अनेक लोकांचे टॅटू बनवतात. त्यांच्यापैकी कोणालाही एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्याच सुईचा वापर करून इतर सर्वांना एचआयव्हीची लागण होईल. सध्या तरुणांमध्ये टॅटू काढण्याची फॅशन सुरू आहे. टॅटू काढताना टॅटू काढणाऱ्याने नवीन सुई घेतली आहे की नाही हे अवश्य पहावे. (12 people infected with HIV after getting tattoos in Varanasi)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.