नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या(Prime Minister Narendra Modi) हस्ते आज सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी 150 इलेक्ट्रिक बसेसच्या (Electric buses) ताफ्याचे लोकार्पण व बाणेरमध्ये(Baner) अत्याधुनिक ई-बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले . मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड( MEIL) याची उपकंपनी असलेल्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने उत्पादित केलेल्या 150 ई- बसेसला हिरवा झेंडा दाखवत त्याचे आभासी पद्धतीने उदघाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाला डिझेलची वाढ टाळण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.
“पुणे शहरातील इलेक्ट्रिक बसेसच्या सध्याच्या 150 बसेसच्या ताफ्यात आणखी 150 ताफ्याचा समावेश करताना ऑलेक्ट्राला अभिमान वाटत आहे. प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी ऑलेक्ट्रा आपल्या प्रयत्नांसाठी कटिबद्ध आहे. इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतूक प्रणालीद्वारे ध्वनी प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही मत सीएमडी के व्ही प्रदीप यांनी व्यक्त केले आहे. हैदराबादस्थित मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडने ( MEIL) एमईआयएल ही हैदराबाद येथील कंपनी झोझिला बोगद्याचं बांधकाम करत आहे. हा भारतातील मोठा पायाभूत सुविधांचा प्रकल्प आहे. या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील प्रमुख कंपन्यांमधील ही एक कंपनी आहे. जगातील 10 देशांमध्ये कंपनीचे आपलं जाळे विस्तारले आहे.
बसेसची लांबी 12-मीटर आहे आणि वातानुकूलित वाहनांमध्ये 33 पेक्षा जास्त लोक बसू शकतात.
बसमध्ये बसवण्यात आलेली लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी एका चार्जवर सुमारे 200 किमी पर्यंतचा प्रवास करू शकते .
हाय-पॉवर एसी आणि डीसी चार्जिंग सिस्टम 3-4 तासांमध्ये बॅटरी रिचार्ज करण्यास सक्षम आहे.
याबरोबरच बसेसमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशन, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन बटणे यांचा समावेश आहे.
Gondia Accident | गोंदिया जिल्ह्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू
VIDEO: आणि मोदी आठवलेंच्या खांद्यावर हात ठेवून हसले, गप्पाही रंगल्या