कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला, 17 जवानांना वीरमरण

सीआरपीएफ-डीआरजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण आलं आहे (Naxal attack on CRPF in Sukma Chhattisgarh).

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला, 17 जवानांना वीरमरण
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 6:58 PM

रायपूर (छत्तीसगड) : सीआरपीएफ-डीआरजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण आलं आहे (Naxal attack on CRPF in Sukma Chhattisgarh). शनिवारी रात्री (21 मार्च) सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन अंर्तगत असणाऱ्या बुर्कापाल जंगलात सीआरपीएफने कोंबिंग ऑपरेशन सुरु केलं (Naxal attack on CRPF and DRG). यावेळी नक्षलवाद्यांनी कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या 150 जवानांवर अचानक हल्ला केला. यानंतर पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. नक्षलवाद्यांशी लढताना 14 जवानही जखमी झाले.

दरम्यान, सीआरपीएफ आणि आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर सुरुवातीला 13 जवान बेपत्ता होते. मात्र, शोध मोहिमेत त्यांचे मृतदेह सापडले. पोलिस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीच्या वेळी पोलिस दलाला नक्षलवाद्यांनी वेढल्यानंतर जिल्हा मुख्यालयाकडून मदत मागण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांचं हेलिकॉप्टर घटनास्थळावर दाखल झालं. हेलिकॉप्टर बघताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस जवानांवर रायपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन वर्षांपूर्वीदेखील सुकमा जिल्ह्यातील बुर्कापाल जंगल परिसरातच 200 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ पथकावर हल्ला केला होता. सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालत असताना बुर्कापाल जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.

संबंधित बातम्या:

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर मोठा हल्ला, 14 जवान जखमी, 13 बेपत्ता

Naxal attack on CRPF in Sukma Chhattisgarh

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.