रिया शर्मा नावाने कॉल आला, अन त्याचे 2.69 कोटी कधी डुबले कळलेच नाही
फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या साईटवरून फ्रेंड रिक्स्वेट पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. सौर ऊर्जा क्षेत्रातील एका बड्या व्यापाऱ्याला एका तरूणीने समाजमाध्यमावरुन मैत्री करीत लुबाडले.
गुजरात: समाजमाध्यमावर मैत्री करीत तरूणींच्या नावाने व्हीडीओ कॉल करीत फसवणूक करण्याचे प्रकार अलिकडे खूपच वाढले आहेत. आधीही अशा प्रकरणात अनेक बड्या व्यक्ती हनी ट्रॅपमध्ये सापडत आहेत. अशाच एका प्रकरणात एका व्यापाऱ्याने फ्रेंडशिप सुरू केली आणि त्याचे जगणे अक्षरश: अवघड बनले. तब्बल 2.69 कोटी रूपये त्याच्याकडून लुबाडण्यात आले आहेत.
फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या साईटवरून फ्रेंड रिक्स्वेट पाठवून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. या प्रकरणात रिया शर्मा नावाने फ्रेंड रिक्स्वेट पाठवून गुजरातच्या एका व्यापाऱ्याला चांगलेच गंडवल्याचे उघड झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच मोरबी येथील कथित रिया शर्मा नावाने कॉल करीत एका व्यापाऱ्याशी तिने मैत्री केली. त्यानंतर व्हीडीओ कॉल करीत त्याचे कपडे तिने उतरवायला लावले. त्यानंतर हा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पन्नास हजार मागितले.
हे पैसे व्यापाऱ्याने दिल्यानंतर काही दिवसाने त्याला दिल्ली पोलीसांकडून कॉल आला. इन्सपेक्टर गुड्डू शर्मा नावाने कॉल करीत त्याने ही क्लीप आपल्या ताब्यात असल्याचे सांगत तीन लाख रूपये मागितले. 14 ऑगस्ट रोजी दिल्ली सायबर सेलमधून बोलत असल्याची बतावणी करीत एकाने कॉल केला आणि संबंधित तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून प्रकरण मिटविण्यासाठी 80.97 लाख रूपये व्यापाऱ्याकडे मागण्यात आले. या व्यापाऱ्याने घाबरून ही रक्कमही तातडीने दिली. नंतर सीबीआयमधून एका अधिकाऱ्याचा कॉल आला. या तरूणीच्या आईने सीबीआयला तक्रार केल्याचे सांगत या अधिकाऱ्याने 8.5 लाख रूपये मागितले.
डिसेंबर महीन्यापर्यंत हा व्यापारी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करीत गेला. त्यानंतर ही केस क्लोज झाल्याची ऑर्डर त्याला दाखवण्यात आल्याने त्याला संशय आला. त्याने 10 जानेवारी रोजी सायबर क्राईम ब्रँचकडे त्याने 11 जणांविरूद्ध 2.69 कोटी लुबाडल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कलम 387, 420, 120 बी नूसार गुन्हा दाखल झाला असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.