एका ( न झालेल्या) लग्नाची गोष्ट ! मंडपात दोन बहिणींचं लागणार होतं लग्न, मात्र वराचा कारनामा पाहून…
हरियाणातील नूंह येथील दोन सख्ख्या बहिणींच्या लग्नाची सध्या खूप चर्चा सुरू आहे. एकाच मांडवात त्यांच लग्न होणार होतं, मात्र लग्नं लागण्याच्या अवघा काही वेळ आधीच दोन्ही बहिणींना त्यांच्या होणाऱ्या पतीचा कारनामा कळताच त्यांनी सप्तपदी घेण्यास नकार दिला
हरियाणातील नूंह येथील दोन सख्ख्या बहिणींच्या लग्नाची सध्या खूप चर्चा सुरू आहे. एकाच मांडवात त्यांच लग्न होणार होतं, मात्र लग्नं लागण्याच्या अवघा काही वेळ आधीच दोन्ही बहिणींना त्यांच्या होणाऱ्या पतीचा कारनामा कळताच त्यांनी सप्तपदी घेण्यास नकार दिला. त्या नकारामागचं कारण विचारल्यावर म्हणाल्या – आम्हाला दारूड्या वराशी लग्न करायचं नाहीये. मात्र हे ऐकून सगळेच हक्काबक्का झाले. वरात घेऊन आलेले पाहुणे आणि मुलीकडचे नातेवाईक यांच्यात बराच वाद झाला. प्रकरण एवढं पेटलं की पोलिसांनाही बोलवावं लागलं.
अखेर पोलिसांनी सर्वांना शांत करत दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं. मग दोन्ही वधूंशीसुद्धा पोलीस बोलले. त्यावर वधूंनी सांगितलं की – ( त्यांच्या) होणाऱ्या पतीने दारू प्यायली आहे. जिथे दारू पीत असतील, अशा घरात जाण्याची आम्हाला तरी इच्छा नाही. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बहिणींच्या निर्णयाचं समर्थन केलं. अखेर दोन्ही वरांना घेऊन त्यांची वरात परत घरी गेली. लग्नमंडपात ठाम राहून निर्णय घेणाऱ्या त्या दोन्ही बहिणींचं सर्वांनीच कौतुक केलं.
हे प्रकरण तावडू परिसरातील आहे. तिकडे जौरासी गावात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा विवाह 1 नोव्हेंबर रोजी होणार होता. दोन्ही बहिणींचे लग्न एकाच दिवशी ठरले होते. त्यांचं नातं संबंध गुरुग्रामच्या सुखराली भागात राहणाऱ्या दोन तरुणांशी जुळलं होते. वाजत गाजत वरात घेऊन दोन्ही वर लग्नासाठी आले. त्यांचं चांगलं आदरातिथ्य करण्यात आलं. वरमाला घालण्याचा विधीही होणार होता, मात्र जेव्हा दोन्ही वधू लग्नमंडपात आल्या, तेव्हाच त्यांना सांगण्यात आलं की दोन्ही वरांनी दारू प्यायली आहे.
दारूड्यांशी लग्न करण्यास नकार
मात्र हे ऐकताच नववधू मंडपातून उठल्या. हे लग्न करण्यास त्यांन थेट नकारच दिला. मात्र त्यांचा निर्णय ऐकून सगळेच थक्क झाले. नववधू म्हणाल्या – आम्ही दोघे लहान असताना आमच्या आई-वडिलांचे निधन झाले. भाऊ आमचं लग्न लावतोय. पण आम्हाला पुढचं आयुष्य ज्याच्यासोबत काढायचं आहे, ते तर दारूडे आहेत. लग्नाच्या दिवशीही त्यांनी दारू प्यायली आहे. मग पुढे आमचं त्यांच्यासोबत भविष्य काय असेल याचा तुम्हीचा विचार करा. मात्र वधूंचं हे बोलणं ऐकून वरात घेऊन आलेले नातेवाईक त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले.
हवेत गोळीबाराचाही आरोप
त्यानंतरही दोन्ही वधू त्यांच्या नकारावर ठाम राहिल्या. त्यांचा नकार ऐकून वरपक्ष आणि वधूपक्ष यांच्यात जोरदार वादावादी सुरू झाली. वधूपक्षावर दबाव टाकण्यासाठी वराकडच्या लोकांनी हवेत गोळीबारही केला असा आरोप वधूच्या नातेवाईकांनी केला. अखेर कोणीतरीह पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लग्नस्थळ गाठून सर्वांना शांत केलं. होणाऱ्या वधूंनी सर्वमुद्दे पोलिसांसमोर माडंत आपला निर्णय सांगितला. पोलिसांनाही त्यांचं म्हणणं पटल्याने अखेर वराकडचे लोक वधू न घेताचा रिकाम्या हातांनी वरात घएऊन परतले. दोन्ही बहिणींच्या या निर्णयाचे सगळेच कौतुक करत आहेत. त्यांच्या भावानेही बहिणींच्या निर्णयाला सपोर्ट केला. याच न झालेल्या लग्नाची सगळीकडे चर्चा आहे.