भारतात नव्या कोरोनाचे 20 रुग्ण, ब्रिटनहून पुण्यात आलेल्या 100 जणांचा पत्ता लागेना
देशात नव्या स्ट्रेनचे जवळपास 20 रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे.
मुंबई : SARS-CoV-2 या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा शिरकाव भारतात झाला आहे. जवळपास 20 भारतीय नागरिकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. आतापर्यंत डेनमार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलीया, इटली, फ्रान्स, स्वीडन, स्वीत्झर्लंड, स्पेन, कॅनाडा, जर्मनी, लेबनॉन, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये नव्या कोरनाचा शिरकाव झाला आहे. त्यांनतर तो भारतातही आला आहे. भारतात आढळलेल्या 20 रुग्णांपैकी तीन जण बंगळुरु दोन हैदराबाद आणि एक रुग्ण पुणे येथील आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका मुलीलासुद्धा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत ब्रिटनहून भारतात परतलेली आहे. (20 patients of the new corona strain found in india)
विमानतळावरुन पळालेल्या महिलेला नव्या कोरोनाची लागण
आंध्र प्रदेशधील एक 47 वर्षीय महिला ब्रिटनहून दिल्ली विमानतळावर उतरली होती. ती मूळची उत्तर प्रदेशमधील आहे. यावेळी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ती पळून गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार विमातळातून पळ काढल्यानंतर ही महिला 22 डिसेंबर रोजी रेल्वेने विशाखापट्टनमला गेली. प्रवासादरम्यान तिने फोन बंद केला होता. त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तिला ट्रॅक करुन तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच तिला क्वॉरन्टाईन केलं. दरम्यान, या महिलेने जवळपास 1800 किलोमिटर प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान ती कोणकोणत्या नागरिकांच्या संपर्कात आली असेल, याचा शोध सुरु आहे.
अंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट
नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी खबरदारी घेणे सुरु केलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तेथील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनहून परतेलेल्या 1,423 पैकी 1,406 नागरिकांना ट्रेस करण्यात आलं आहे.
पुण्यात 109 प्रवाशांचा माहिती मिळेना
दरम्यान, मागील 15 दिवसांत ब्रिटनमधून पुण्यात काही नागरिक आले आहेत. एकूण 109 नागरिकांचा येथील प्रशासन सोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यापैकी काही नागरिकांच्या घराचा पत्ता प्रशासनाकडे आहे. तर काही प्रवाशी फोन उचलत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणे अवघड होऊन बसले आहे. याबाबत बोलताना, “ब्रिटनहून काही प्रवासी मुंबईला उतरले. त्यांनतर ते पुण्याला आले. आम्ही या प्रवाशांना ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये” असे पुणे प्रशासनाने सांगितले.
संबंधित बातम्या :
New COVID Strain | कोरोनाच्या नव्या अवताराची डोकेदुखी, यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात 40 हजार रुग्ण
(20 patients of the new corona strain found in india)