2000 note exchange : गुलाबी नोटेचा पाठवणी महोत्सव! आजपासून बँकेसमोर रांगा, हे नियम करा फॉलो
RBI News on 2000 Note : आजपासून गुलाबी नोटेचा पाठवणी महोत्सव सुरु होत आहे. थोड्याच वेळात बँकांमध्ये तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील, पण त्यासाठी या नियमांचं पालन करावं लागेल...
नवी दिल्ली : देशात गुलाबी नोटेच्या पाठवणी महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. देशात 2000 रुपयांची नोट (2000 Rupees Note) लवकरच बंद होईल. पण त्यासाठी अजून चार महिन्यांचा कालावधी आहे. गेल्या वर्षभरापासून अनेकांना या नोटेचे दर्शन झालेले नाही. ज्या नागरिकांकडे या गुलाबी नोटा आहेत, त्यांनी देशातील बँकांच्या कोणत्याही शाखेतून नोट बदलता येतील. नोट बदलीचा हा सोहळा संपूर्ण चार महिने सुरु राहिल. देशात 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलता (Exchange Of Notes) येतील. या नोटांची वैधता चार महिने अजून कायम आहे. तुम्ही अजून चार महिने खरेदी करु शकता. व्यवहारात ही नोट वापरु शकता.
महत्वपूर्ण बदल RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे एका मर्यादेपर्यंत या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज अथवा ओळखपत्र दाखविण्याची गरज नाही.
रोख आणि रोख न्या आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.
खात्यात जमा करता येतील कितीही 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करायच्या असतील तर, त्याची कोणतीच मर्यादा नाही. तुम्हाला खात्यात किती ही नोटा जमा करता येतील. पण त्यासाठी बँकेशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल.
तर पॅनकार्ड दाखवा 50,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यासाठी पॅनकार्ड दाखवावे लागेल आणि त्याचा तपशील द्यावा लागेल. नियमानुसार, एका मर्यादेपेक्षा अधिकची रोख जमा केल्यास बँका शुल्क आकारतील.
बाजारात सुरु राहतील 2000 रुपयांची नोट आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, आज 23 मेपासून नोट एकदम रद्द होणार नाहीत. चार महिन्यानंतर या बाजारात, व्यवहारात वापरता येणार नाही. त्यामुळे केंद्रीय बँका या नोटा माघारी बोलवत आहेत. या नोटांचा वापर सध्या खरेदीसाठी, व्यवहारात वापरता येतील. सध्या नागरिक अनेक ठिकाणी या नोटांचा वापर करत आहेत.
127 दिवसांत बदला 26 लाख आरबीआयच्या परिपत्रकानुसार, 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. ही मर्यादा एका दिवशी 20 हजार रुपायांपर्यंत आहे. म्हणजे 127 दिवसांमध्ये नागरिकांना 25,40,000 रुपये जमा करता येतील.
इतक्या नोटा चलनात RBI च्या अहवालानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत 2,000 रुपयांच्या (2000 Rupee note) एकूण 214.20 कोटी नोटा चलनात होत्या. एकूण नोटांच्या हे प्रमाण 1.6% आहे. मूल्यानुसार एकूण 4,28,394 कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात होत्या. इतक्या प्रमाणात नोटा असूनही त्या चलनात, व्यवहारात न दिसल्याने नागरिकांना पूर्वीच बंद होण्याची आशंका होती.