2000 Rupees Note : मोठी बातमी! 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मिळू शकते मुदतवाढ

Rupees Note : 2000 रुपयांच्या नोटेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. या नोटा बदलण्याची डेडलाईन उद्यावर येऊन ठेपली आहे. या ऑगस्टपर्यंत 93 टक्के नोटा परत आल्या आहेत. पण नोटा बदलण्यासाठी आता मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या चर्चांना उधाण आले आहे. कोणती असेल नवीन तारीख

2000 Rupees Note : मोठी बातमी! 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मिळू शकते मुदतवाढ
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 5:22 PM

नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : दोन हजार रुपयांच्या नोटा (2000 rupee note) बदलण्याची अंतिम मुदत आता अगदी तोंडावर आली आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी ही शेवटची तारीख होती. पण आता ही डेडलाईन वाढण्याची शक्यता आहे. Moneycontrol च्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयीचा खुलासा केला आहे. त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँक 2,000 रुपयांची नोट माघारी बोलविण्यासाठी मुदतवाढ करण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आरबीआय 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी ( 2000 rupee note exchange) मुदत वाढ देऊ शकते. काही परदेशी नागरिकांना या नोटा बदलण्यासाठी वेळ हवा असल्याचे समोर येत आहे.

93 टक्के नोटा आल्या परत

आतापर्यंत 3.32 लाख कोटी रुपये मूल्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा (2000 rupee note) माघारी बोलावल्या होत्या. वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने 1 सप्टेंबर रोजी सांगितल्याप्रमाणे, त्यातील 93 टक्के नोटा परत आल्या आहेत. 31 जुलैपर्यंत 3.14 लाख कोटी रुपयांच्या 88 टक्के नोटा बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. यावर्षी आरबीआयने 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोट माघारी बोलविण्याची घोषणा केली होती आणि लागलीच या निर्णयावर अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

या कारणामुळे वाढवली मुदत

यापूर्वी नोटाबंदी करताना केंद्र सरकारने ही गुलाबी नोट बाजारात उतरवली होती. या नोटांचा पण साठ होत असल्याचा आरोप होत होता. तर केंद्र सरकारने अनेक दिवसांपासून त्यांची छपाई बंद केली होती. या नोटा गेल्या वर्षापासून चलनातूनही गायब झाल्या होत्या. पण मे महिन्यात आरबीआयने ही नोट माघारी बोलविण्याची कवायत सुरु केली.

नवीन तारीख कोणती

आरबीआय मुदत वाढ करण्याची चर्चा सध्या रंगली आहे. 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा बदलण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी वाढून दिल्या जाऊ शकतो. पुढील महिन्याची शेवटची तारीख निश्चित केल्या जाऊ शकते. अर्थात याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आरबीआयने पण याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

काय झाला होता निर्णय 

भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1,000 रुपयांची नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर 2,000 रुपयांची नोटी व्यवहारात सादर करण्यात आली. काळ्या धनाविरोधात कारवाईसाठी ही नोटबंदी करण्यात आली होती.

चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.