2002 Gujarat Riots : ’60 लोकांना, 16 दिवसांच्या मुलीला आईच्या कुशीत जिवंत जळताना मी पाहिलंय’

2002 Gujarat riots : एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान, 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर बातचीत करण्यात आली.

2002 Gujarat Riots : '60 लोकांना, 16 दिवसांच्या मुलीला आईच्या कुशीत जिवंत जळताना मी पाहिलंय'
अमित शाह
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 11:29 AM

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीबाबत (2002 Gujarat Riots) महत्त्वपूर्ण वक्तव्य केली. गुजरात दंगल ही मुळातच गुजरात ट्रेन जाळल्यामुळे झाली होती. हेच या दंगलीचं प्रमुख कारण होतं, असं ते म्हणाले. यावेळी 60 लोकांना, 16 दिवसांच्या मुलीला आईच्या कुशीत जिवंत जळताना मी पाहिलंय, मी माझ्या हाताने एका गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत, असंही विधान त्यांनी केलं. मात्र या घटनेनंतर जे झालं, ते पॉलिटिकली मोटिवेटेड होतं, असा ते म्हणालेत. गुजरात दंगलीबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल हा देशातील भाजप सरकारसाठी एक महत्त्वाचा निकाल आहे. या निकालानं भाजप सरकारवर एक मोठा डाग पुसला गेलाय. मोदींवर केला जात असलेल्या एका मोठा आरोप सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानं खोटा असल्याचं स्पष्ट केलंय. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह (Amit Shah) यांनी हे विधान केलंय.

गंभीर आरोपांवर रोखठोक उत्तरं

एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान, 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर बातचीत करण्यात आली. तत्कालीन राज्य सरकार, नरेंद्र मोदी आणि भाजप या तिघांवरही या दंगलीवरुन गंभीर आरोप करण्यात आले होते. या दंगलीला राज्य सरकार नरेंद्र मोदी आणि भाजप जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे सगळे आरोप सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं खोटे असल्याचं अखेर स्पष्ट करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा संपूर्ण मुलाखत

दंगल राजकीय हेतूने प्रेरीत

सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात संजीव भट्ट, हरेन पांड्या आणि आरबी श्रीकुमार यांच्या साक्षबी खरी असल्याचं म्हटलंय. हे दंगल प्रकरण केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि राजकीय हेतूने प्रेरीत होतं, तसंच अनेक खोटे खुलासे या प्रकरणी करण्यात आले होते, अस म्हणत सुप्रीम कोर्टाने निकालात सुनावलंय. तसंच राज्य सरकारच्या असंतुष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरजही कोर्टानं यावेळी व्यक्त केली.

विरोधकांना चपराक

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात दंगलीबाबत महत्त्वाचा मानला जातोय. गुजरातमध्ये हिंसाचार भडकला जाण्यामागे एक खोटा कट रचला गेल्याचा आरोप अमित शाह यांनी यावेळी बोलताना केला. आता आलेल्या निर्णयानं नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेसाठी आणि भाजप सरकारच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावेल. तसंच या निर्णयानं विरोधकांना चपराक बसल्याचं शाह म्हणालेत. सत्य समोर आल्यामुळे आता ते सोन्यापेक्षा जास्त चमकत असल्याचा दावा यावेळी अमित शाह यांनी यावेळी केलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.