नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीबाबत (2002 Gujarat Riots) महत्त्वपूर्ण वक्तव्य केली. गुजरात दंगल ही मुळातच गुजरात ट्रेन जाळल्यामुळे झाली होती. हेच या दंगलीचं प्रमुख कारण होतं, असं ते म्हणाले. यावेळी 60 लोकांना, 16 दिवसांच्या मुलीला आईच्या कुशीत जिवंत जळताना मी पाहिलंय, मी माझ्या हाताने एका गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत, असंही विधान त्यांनी केलं. मात्र या घटनेनंतर जे झालं, ते पॉलिटिकली मोटिवेटेड होतं, असा ते म्हणालेत. गुजरात दंगलीबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल हा देशातील भाजप सरकारसाठी एक महत्त्वाचा निकाल आहे. या निकालानं भाजप सरकारवर एक मोठा डाग पुसला गेलाय. मोदींवर केला जात असलेल्या एका मोठा आरोप सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानं खोटा असल्याचं स्पष्ट केलंय. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह (Amit Shah) यांनी हे विधान केलंय.
एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान, 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर बातचीत करण्यात आली. तत्कालीन राज्य सरकार, नरेंद्र मोदी आणि भाजप या तिघांवरही या दंगलीवरुन गंभीर आरोप करण्यात आले होते. या दंगलीला राज्य सरकार नरेंद्र मोदी आणि भाजप जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे सगळे आरोप सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं खोटे असल्याचं अखेर स्पष्ट करण्यात आलंय.
Interview to ANI. https://t.co/Wxib4Woz8C
— Amit Shah (@AmitShah) June 25, 2022
सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात संजीव भट्ट, हरेन पांड्या आणि आरबी श्रीकुमार यांच्या साक्षबी खरी असल्याचं म्हटलंय. हे दंगल प्रकरण केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि राजकीय हेतूने प्रेरीत होतं, तसंच अनेक खोटे खुलासे या प्रकरणी करण्यात आले होते, अस म्हणत सुप्रीम कोर्टाने निकालात सुनावलंय. तसंच राज्य सरकारच्या असंतुष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरजही कोर्टानं यावेळी व्यक्त केली.
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात दंगलीबाबत महत्त्वाचा मानला जातोय. गुजरातमध्ये हिंसाचार भडकला जाण्यामागे एक खोटा कट रचला गेल्याचा आरोप अमित शाह यांनी यावेळी बोलताना केला. आता आलेल्या निर्णयानं नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेसाठी आणि भाजप सरकारच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावेल. तसंच या निर्णयानं विरोधकांना चपराक बसल्याचं शाह म्हणालेत. सत्य समोर आल्यामुळे आता ते सोन्यापेक्षा जास्त चमकत असल्याचा दावा यावेळी अमित शाह यांनी यावेळी केलं.