जो येतो तो गायब होतो… बागेश्वर धाममध्ये असं काय घडतं?; 4 महिन्यात 21 जण बेपत्ता
Bageshwar Dham : मंगळवार व शनिवारी बागेश्वर धाम येथे येणाऱ्या भाविकांची जास्त गर्दी असते. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काहीतरी मागण्याची इच्छा घेऊन आलेले अनेकजण आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्ती धाममध्ये गमावत आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 21 जण धाममधून बेपत्ता झाले आहेत.
भोपाळ : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामची (Bageshwar Dham) देशभर चर्चा आहे. देश आणि जगातील लोक अर्ज करण्यासाठी दररोज बागेश्वर धाम गाठत आहेत. आठवड्यातील मंगळवार आणि शनिवारी येथे भाविकांची अधिक गर्दी होते. या दोन दिवसांत भाविकांची संख्या लाखांवर पोहोचते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भगवंताकडे काही मागावे या इच्छेने आलेले अनेक लोक आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना धाममध्ये गमावत आहेत. म्हणजेच बागेश्वर धाममधून आजवर अनेक जण बेपत्ता झाले (people are missing) असून त्यांचा शोधही पोलिसांना (police) लावता आलेला नाही.
बागेश्वर धाम येथून बेपत्ता झालेल्यांपैकी अनेक जण मानसिक आजारी आहेत. तर काही जण गर्दीमुळे कुटुंबापासून विभक्त झालेले आहेत. त्यापैकी कोणाचाही पत्ता लागला नाही. आपल्या विभक्त झालेल्या आणि हरवलेल्या लोकांच्या शोधात देशाच्या इतर राज्यात राहणारे अनेक लोक धामच्या पोलीस स्टेशन आणि कार्यालयांच्या चकरा मारत आहेत.
पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2023 पासून बागेश्वर धाम येथून 21 जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी 9 जणांचा शोध लागला असला तरी 12 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. सध्या पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
अद्याप 12 जणांचा शोध सुरू आहे
छतरपूर जिल्ह्याचे पोलिस कॅप्टन अमित सांघी म्हणतात की बेपत्ता झालेल्या इतर 12 लोकांपर्यंत पोहोचण्याचा पोलिस सतत प्रयत्न करत आहेत. कुटुंबीयांकडून तक्रार आल्यानंतर पोलीस बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.
कुठे आहे बागेश्वर धाम ?
बागेश्वर धाम मंदिर मध्य प्रदेश राज्यातील छत्तरपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील गंज शहरापासून 35 किमी अंतरावर गढा गाव वसलेले असून त्याच गावात हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर परिसर बागेश्वर धाम आणि हनुमान जी बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध आहे.
बागेश्वर धाम सरकारचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री आहेत, जे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर म्हणून प्रसिद्ध आहेत. शास्त्री देशभरातील धार्मिक कथा सांगतात. त्याच वेळी, हा कथाकार त्याच्या प्रसिद्ध विधानांमुळे आणि कथांदरम्यान होणारा दैवी दरबार यामुळे सतत चर्चेत असतो.