Nepal plane crash : 22 मृतदेह घटनास्थळी सापडले, नेपाळी सैन्याने केलेल्या शोध आणि बचाव मोहिमेची दृश्ये आली समोर

दरम्यान सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याने, मदत आणि बचाव कार्य हे थांबविण्यात आल्याची घोषणा टेकनाथ सितौला, प्रवक्ते, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, काठमांडू, नेपाळ यांनी केली आहे. तसेच त्यांनी आज संध्याकाळपर्यंत सर्व मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जातील असेही सांगितले आहे.

Nepal plane crash : 22 मृतदेह घटनास्थळी सापडले, नेपाळी सैन्याने केलेल्या शोध आणि बचाव मोहिमेची दृश्ये आली समोर
तारा एअरचे विमानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 11:45 PM

काठमांडू: तारा एअरच्या विमानाच्या (Tara Air plane) ढिगाऱ्यातून 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रविवारी खराब हवामानात देशाच्या डोंगराळ प्रदेशात खाजगी विमान क्रॅश (plane crash) झाल्यानंतर चार भारतीयांसह इतर सर्व प्रवाशांचा यात अंत झाला. यानंतर ती सर्व 22 मृतदेह नेपाळ लष्कराच्या एमआय-7 हेलिकॉप्टरने काठमांडूला पाठविण्यात आले आहेत. जिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाणार आहेत. यादरम्यान आता नेपाळी सैन्याने केलेल्या शोध आणि बचाव मोहिमेची दृश्ये समोर येत असून त्यांनी या अवघड स्थितीत कसे बचाव कार्य केले असेल याची प्रचिती येते. या बचाव कार्याचा एक व्हिडीओ नेपाळी लष्कराकडून (Nepal Army) ANIच्या ट्वीटरवर टाकण्यात आला आहे. ज्यात लष्कराचे जवान बचाव कार्य करताना दिसत आहेत.

चार भारतीयांसह इतर सर्व प्रवाशांचा अंत

तारा एअरचे विमान हे खराब हवामानामुळे रविवारी डोंगराळ प्रदेशात क्रॅश झाले. ज्यात चार भारतीयांसह इतर सर्व प्रवाशांचा यात अंत झाला. तर आता पर्यंत 22 मृतदेह नेपाळ लष्कराच्या जवानांनी बाहेर काढले आहेत. तर याबाबत आता नेपाळी सैन्याने केलेल्या शोध आणि बचाव मोहिमेची दृश्ये व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच यावेळी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलच फिरत आहे. हा व्हिडीओ नेपाळी लष्कराकडून ANIच्या ट्वीटरवर टाकण्यात आला आहे. ज्यात प्रतिकुल परिस्थिती नसतानाही नेपाळी लष्कराचे जवान आपली भूमिका पार पाडत आहेत. ते दोरीच्या साहाय्याने खाली दरीत उतरून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत.

सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले

दरम्यान सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याने, मदत आणि बचाव कार्य हे थांबविण्यात आल्याची घोषणा टेकनाथ सितौला, प्रवक्ते, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, काठमांडू, नेपाळ यांनी केली आहे. तसेच त्यांनी आज संध्याकाळपर्यंत सर्व मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जातील असेही सांगितले आहे.

तर नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, “एकवीस मृतदेह सापडले असून उर्वरित एकाचा शोध पथके घेत आहेत.” या विमानात चार भारतीयही होते. विमान बेपत्ता झाले तेव्हा वैभवी त्रिपाठी आणि तिचा माजी पती आणि त्यांची दोन मुलेही त्यात होती. मात्र आता उर्वरित एक मृतदेह ही सापडला असल्याने हे मदत आणि बचाव कार्य थांबविण्यात आले आहे.

100 मीटरच्या आत मृतदेह विखुरले

तारा एअरच्या प्रवक्त्याने स्थानिक मीडियाला सांगितले की मुख्य इम्पॅक्ट पॉइंटच्या 100 मीटरच्या आत मृतदेह विखुरले होते. ते म्हणाले की, विमानाचे तुकडे झाले आणि ते डोंगरावर आदळले. त्यानंतर सर्वत्र लोकांचे मृतदेह विखुरले गेले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.