BIHAR NEWS | एकाच दिवसात २२ लोकांचा बुडून मृत्यू, लोकांची वेगळीचं चर्चा
एकाचं दिवसात २२ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. ही घटना एका राज्यात घडली आहे. नऊ जिल्ह्यातील लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.
बिहार : एकाच दिवसात २२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नदी आणि तलावात बुडून लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिहार (bihar) राज्यातील असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार बिहार राज्यातील २२ (22 people death) लोकांचा २४ तासात मृत्यू झाला आहे. पोहत असताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. ९ जिल्ह्यातील लोकांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार ज्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार (bihar cm nitish kumar) यांना समजला त्यावेळी त्यांनी सुध्दा दु:ख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना ४ लाख देण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली आहे.
राज्यात मोठ्या उत्साहात सण सुरु असताना ही घटना घडली आहे. सगळ्यात जास्त मृत्यू हे भोजBIJपूर जिल्ह्यातील आहेत. बहियारा जिल्ह्यात सेल्फीच्या नादात पाच मुली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्या. नदीच्या काठावर असलेल्या महिलांनी आरडाओरड केली, परंतु लोकांना तिथं पोहोचायला उशीर झाला. पाचही मुलींचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर केलेल्या माहितीनुसार अलावा जहानाबाद या जिल्ह्यात सुध्दा चार लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. पटना आणि रोहतास या जिल्ह्यात तीन-तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. दरभंगा आणि नवादा जिल्ह्यात दोन-दोन लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. कैमूर, मधेपुरा आणि औरंगाबाद या जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
राज्यात महिला जीवितपुत्रिका सण मोठ्या आनंदात साजरा करतात. त्या महिला आपली मुलं आणि पती यांच्या दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून उपवास ठेवतात. उत्सव सुरु असताना मृत्यू झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर मृत्यू झालेल्या परिसरात स्मशान शांतता पसरली होती. भोजपूर जिल्ह्यात एका गावातील पाच मुली बुडाल्याने संपूर्ण गाव शांत झालं होतं.