3 देश जिथे हिंदूंचं प्रमाण आहे सर्वाधिक, एक भारत, दुसरा नेपाळ तिसऱ्या देशाचं नाव तुम्हालाही नसेल माहीत
नेपाळ हा जगातील असा एकमेव देश आहे. जिथे हिंदूंच्या संख्येची टक्केवारी भारतापेक्षा देखील जास्त आहे. मात्र लोकसंख्येचा विचार केला तर नेपाळमध्ये हिंदूंची संख्या भारतापेक्षा कमी आहे.

भारताचा शेजारी असलेला देश नेपाळ सध्या चांगलाच चर्चेमध्ये आहे, त्याची दोन मुख्य कारणं आहेत, एक म्हणजे देशात पुन्हा एकदा राजेशाही आणा अशी मागणी जोर धरत आहे, त्यावरून आंदोलन सुरू आहे. नेपाळचे आधीचे राजे ज्ञानेंद्र शाह यांना पुन्हा एकदा राजसिंहासनावर बसवण्याची मागणी होत आहे, आणि दुसरी महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करा यासंदर्भात. 2008 मध्ये नेपाळच्या संसदेनं महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार नेपाळमधील हिंदू राजेशाही संपुष्टात आली आणि तिथे लोकशाही राष्ट्राचा उदय झाला. संसदेच्या या निर्णयानंतर नेपाळचे राजे ज्ञानेंद्र शाह यांना आपली गादी सोडावली लागली होती. नेपाळला हिंदू राष्ट्राचा दर्जा मिळाला होता, मात्र या निर्णयानंतर नेपाळ एक धर्म निरपेक्ष राष्ट्र असल्याची घोषणा करण्यात आली.
नेपाळ हा जगातील असा एकमेव देश आहे. जिथे हिंदूंच्या संख्येची टक्केवारी भारतापेक्षा देखील जास्त आहे. मात्र लोकसंख्येचा विचार केला तर नेपाळमध्ये हिंदूंची संख्या भारतापेक्षा कमी आहे. मात्र नेपाळमध्ये राहणाऱ्या हिंदूंची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या 109 कोटी आहे, याचाच अर्थ देशात हिंदू लोकसंख्येचं प्रमाण 78.9 टक्के आहे. तर नेपाळमध्ये एकूण लोकसंख्येंच्या 80.6 टक्के लोक हिंदू आहेत. या आधारावर विचार केल्यास नेपाळमध्ये हिंदूंचं प्रमाण भारतापेक्षा जास्त आहे.
जगात असे तीन देश आहे, ज्या देशात हिंदू लोक बहुसंख्य आहेत. एक भारत, दुसरा नेपाळ आणि तिसरा देश आहे तो म्हणजे पूर्व अफ्रिकेमध्ये येणारा मॉरीशस, मॉरीशसमध्ये देखील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त हिंदू लोकांचं वास्तव्य आहे. या देशात देखील मोठ्या संख्येनं हिंदू लोक आढळून येतात. भारत, नेपाळ यानंतर हिंदू लोकसंख्येमध्ये मॉरीशसचा जगात तिसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येचा विचार केला तर भारत नेपाळच्या पुढे आहे, मात्र टक्केवारीचा विचार केल्यास नेपाळमध्ये भारतापेक्षा अधिक हिदू राहतात. नेपाळमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंची सख्या 80. 6 टक्के एवढी आहे.