Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटची फायनल जिंकण्यापूर्वीच मृत्यूने त्यांना हरवलं, 3 दोस्तांचा वेदनादायक मृत्यू .. त्यांच्यासोबत काय घडलं ?

गावातीलच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी ते तिघे एकाच बाईकवर बसून एकत्र जात होते. घनदाट धुक्यामुळे समोरचं नीट दिसत नव्हतं तरी ते कशीबशी बाईक चालवत ते पुढे निघाले. तेवढ्यात समोरून भरधाव वेगाने एक ट्रक आला आणि.....

क्रिकेटची फायनल जिंकण्यापूर्वीच मृत्यूने त्यांना हरवलं, 3 दोस्तांचा वेदनादायक मृत्यू .. त्यांच्यासोबत काय घडलं ?
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 12:14 PM

जयपुर | 19 जानेवारी 2024 : गावातीलच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी ते तिघे एकाच बाईकवर बसून एकत्र जात होते. घनदाट धुक्यामुळे समोरचं नीट दिसत नव्हतं तरी ते कशीबशी बाईक चालवत ते पुढे निघाले. तेवढ्यात समोरून भरधाव वेगाने एक ट्रक आला आणि त्यांची बाईक त्यावर आदळली. काही कळायच्या आतच ते तिघेही जमीनीवर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागला, रक्तबंबाळ अवस्थेत ते तसेच रस्त्याच्या कडेला पडून होते. दोघांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अनेक तास उलटूनही त्यांच्या बद्दल कोणतीच माहिती मिळेना अखेर दुपारनंतर त्यांच्या बाईक नंबरच्या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आणि घरच्यांना फोन केला. मुलांच्या मृत्यूच्या बातमीमुळे घरात एकच कल्लोळ उठला. सकाळी क्रिकेट खेळायला गेलेले तिघे फायनल मॅच खेळण्यापूर्वीच हरले, मृत्यूने त्यांना हरवलं.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला. जयपूरजवळील कोतपुतली परिसरात सकाळी दाट धुक्यामुळे एका डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या तीन तरूणांना चिरडलं. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने रुग्णालयात जाताना अखेरचा श्वास घेतला. अमित मीणा , अमित शर्मा आणि विवेक साहनी अशी तिघांची नावे असून ते 20 ते 25 वयोगटातील होते. तरण्या ताठ्या मुलांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खाला पारावार उरला नाही.

डंपरच्या धडकेने लागली काळझोप

हे सुद्धा वाचा

ही संपूर्ण घटना कोटपुतली परिसरात असलेल्या सरुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आठवड्यात घडली. तेथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दाट धुक्यामुळे अल्वर-सीकर महामार्गावर सकाळी 10:00 वाजता हा अपघात झाला. दुचाकीवर बसलेल्या तीन मित्रांना समोरून येणाऱ्या डंपर चालकाने चिरडले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिसर्‍याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

क्रिकेटची फायनल मॅच खेळण्यासाठी जात होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित मीणा, अमित शर्मा आणि विवेक साहनी हे तिघे मित्र कोटपुतळीजवळील नरहेरा परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी जात होते. तिघेही चांगले खेळाडू असून काही दिवसांपूर्वी त्यांनी गावात ट्रॉफीही जिंकली होती. घटनेच्या दिवशीच क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होता आणि स्पर्धा जिंकण्यासाठी 21000 रुपयांचे चे बक्षीस होते. या तिघांनाही आपण ती ट्रॉफी जिंकू असा विश्वास होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं, अंतिम सामना खेळण्यापूर्वीच काळासमोर ते हरले.

एकाच काही महिन्यांपूर्वीच झाला विवाह

पोलिसांनी सांगितले की, अमित मीणाचे काही काळापूर्वीच लग्न झालं. त्याचे वडील मजुरीचे काम करतात. त्याच्या कुटुंबात बहिणी आणि भाऊही आहेत. तर अमित शर्माचे वडील पूजा करतात आणि त्यालाही तीन भाऊ आणि बहिणी आहेत. अमित त्यांच्यात सर्वात लहान आहे. विवेक हा बी फार्मा मध्ये शिकला आहे, वडील खाजगी कंपनीत काम करतात. तीन तरूणांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.