एका दिवसात 3 लग्ने, 27 जणींचा गर्भपात, या नवाबाने सर्वच मर्यादा ओलांडल्या…

ही एक इस्लामिक वाईट प्रथा होती. या प्रथेनुसार केला जाणारा विवाह हा कधी एक दिवसासाठी तर कधी दोन महिन्यांसाठी केला जातो. फक्त मनोरंजनासाठी असा विवाह केला. मुताहचा कालावधी संपल्यानंतर त्यांचा घटस्फोट मंजूर केला जातो.

एका दिवसात 3 लग्ने, 27 जणींचा गर्भपात, या नवाबाने सर्वच मर्यादा ओलांडल्या...
NAWAB VAJID ALI SHAH Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 10:05 PM

लखनौ | 16 जानेवारी 2024 : प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या प्रथा आणि श्रद्धा असतात. पण, यात अनेक वाईट प्रथा आहेत हेही सत्य आहे. काही परंपरावादी लोक याच प्रथांचा उपयोग दुर्बल घटकाचे शोषण करण्यासाठी करतात. अशीच एका वाईट प्रथा म्हणजे निकाह मुताह. ज्यामध्ये विवाह हा फक्त एक करार आहे. ही एक इस्लामिक वाईट प्रथा होती. या प्रथेनुसार केला जाणारा विवाह हा कधी एक दिवसासाठी तर कधी दोन महिन्यांसाठी केला जातो. फक्त मनोरंजनासाठी असा विवाह केला जात असे. मुताहचा कालावधी संपल्यानंतर त्यांचा घटस्फोट मंजूर केला जातो. याच वाईट प्रथेचा उपयोग करून एका नवाबाने तब्बल 300 विवाह केले होते.

नवाब वाजिद अली शाह यांनी मुताह अंतर्गत अनेक विवाह केले होते. नवाब वाजिद अली शाह यांचा जन्म लखनऊमध्ये ३० जुलै १८२२ रोजी झाला. २१ सप्टेंबर १८८७ रोजी कोलकाता येथे त्यांचा मृत्यू झाला. एका दिवसात त्यांनी तीन लग्ने केली होती. तसेच, त्यांनी संपूर्ण आयुष्यात 300 लग्न केली होती. पण, यातील दोन निकाह सोडता बाकीचे सर्व निकाह हे मुताह केले होते.

इतिहासकार डॉ. रवी भट्ट यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नवाब वाजिद अली शाह हे सर्वात सुशिक्षित नवाब होते. त्यांनी 100 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. लोक त्यांना साहित्यातही खूप आदर आणि सन्मान देतात. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे नवाब वाजिद अली शाह यांच्या जवळपास 378 बेगम होत्या. तसेच एका दिवसात 27 बेगमांचा गर्भपात केल्याची माहिती त्यांनी दिली.

नवाब वाजिद अली शाह यांच्या लिहिलेल्या काही पुस्तकांमध्ये त्यांच्या 49 बेगम असल्याचे म्हटले आहे. पण, 1856 मध्ये इंग्रजांनी त्यांच्याकडून सर्व काही काढून घेतले. त्यानंतर ते कोलकात्याला गेले. तोपर्यंत त्यांना 60 ते 70 बायका होत्या. कोलकात्याला गेल्यानंतर ते मटिया बुर्जमध्ये राहत. त्यावेळी त्यांच्या 300 हून अधिक बायका होत्या असे त्यांनी सांगितले.

नवाब वाजिद अली शाह यांनी 16 नोव्हेंबर 1859 रोजी एका दिवसात नवाब वाजिद अली शाह यांनी कोलकाता येथे तीन लग्न केली होती. लंडन येथून प्रकाशित झालेल्या ‘द लास्ट किंग ऑफ इंडिया’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे. त्या काळात इंग्रजांना सर्व माहिती द्यायची होती म्हणून तिथे रजिस्टर केले होते. याच रजिस्टरमध्ये एका दिवसात तीन लग्नांचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे नवाब यांच्या सर्व बायकांची माहिती देण्यात आली आहे असे डॉ. रवी भट्ट यांनी सांगितले.

नवाब वाजिद अली शाह यांचा पहिला विवाह बेगम अख्तर महल यांच्याशी निकाहच्या माध्यमातून झाला होता. तर, दुसरा निकाह बेगम खास महल यांच्याशी झाला. तर बाकीचे सर्व विवाह हे मुताह पद्धतीने झाले होते. हा सर्व इतिहास पाहता नवाब वाजिद अली शाह यांच्या जवळपास ३७८ बेगम होत्या आणि त्याने एका दिवसात 27 बेगमांचा गर्भपात केला होता असे त्यांनी सांगितले.

तात्पुरता विवाह किंवा ‘निकाह मुताह’ ही एक प्राचीन इस्लामिक प्रथा आहे. ही प्रथा पुरुष आणि स्त्रीला विवाह बंधनात बांधते. परंतु केवळ मर्यादित कालावधीसाठी. पुरुषांनी लांबचा प्रवास करताना आपल्या बायकोला थोड्या काळासाठी सोबत ठेवण्यासाठी ही प्रथा वापरली जात असे. सुन्नी मुस्लिम निकाह मुताहचा वापर करत नाही. मात्र, शियांमध्ये याची परवानगी आहे. मुताह शब्दाचा अर्थ आनंद, मजा किंवा फायदा असा होतो. त्यामुळे लग्नासारख्या पवित्र नात्याच्या उद्देशावर हा शब्द प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याने या प्रथेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही वाईट प्रथा आता बंद झाली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.