नवरदेवाकडून ११ दिवसात २५ जणांना स्मशानापर्यंत खांदा, आता त्याचे थकलेले पाय फक्त बॅटरीच्या बाहुल्यांसारखे प्रेतयात्रेत चालतात

आतापर्यंत ११ दिवसात २५ अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण जीवनासाठी हा मोठा धक्का आहे, आतापर्यंत ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर गावातील मंडळी देखील या लग्नात सहभागी झाली होती.

नवरदेवाकडून ११ दिवसात २५ जणांना स्मशानापर्यंत खांदा, आता त्याचे थकलेले पाय फक्त बॅटरीच्या बाहुल्यांसारखे प्रेतयात्रेत चालतात
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 7:47 PM

जयपूर : तो घोड्यावर बसण्याआधी सर्व नवरदेव लग्नाच्या रंगात रंगतात, तसाच पुढची स्वप्न पाहत होता. नवरदेवाला सजवलं जात होतं, नवरी देखील काही क्षणात मंडपात पोहोचेल, असे मंगलमय, दोन जीव एकत्र येतील, ते देखील सर्वांच्या साक्षीने असा क्षण आला होता. नवरदेवाचे आईवडील, बहिणी, भाऊ, लहान भाचे, नवे कपडे घालून लग्नासाठी तयार होते. घरात लग्नाचा उत्साह आणि लगबग सुरु होती.जेवणाचा खमंग सुगंध येत होता. लग्नानंतर पंगतीत पोटपूजा होणार होती. पण नियतीला यापुढे या घरात आणि लग्नात आलेल्या लोकांच्या आयुष्यातील एकही आनंदाचा क्षण मान्य नव्हता. यानंतर अशी घटना घडली जी कुणाच्याही आयुष्यात ती देखील लग्नाच्या वेळी कधीच घडू नये.

पण अचानक नियतीने काही लोकांच्या आयुष्यावर हल्ला केला. लग्नमंडपाच्या बाजूला असलेल्या सिलेंडरमधून एक सिलिंडर लिक झालं आणि त्याने पेट घेतला. त्यासोबत आणखी सिलिंडर पेटले. धडाधड आवाज होत गेले, किंचाळण्याचा आवाज झाला, कुणालाही काही कळत नव्हतं की नेमक्या एवढ्या उष्ण आणि क्षणात भाजून काढणाऱ्या ज्वाळा कुठून आल्या.

या पेटत्या सिलिंडरच्या ज्वाळा लहान मुलं, म्हातारी माणसं, ते सर्वांनाच भाजून काढत होत्या, आख्खं घर पेटलं. आग विझवण्याचा प्रयत्न सुरुच होता, एक सिलिंडर उडून लग्न मंडपात देखील आलं. काही लोकांनी सिलिंडर जे चांगले होते ते बाजूला क उतर काही लोकांनी काही तासानंतरही आग विझवण्यात आली, पण सर्वांनी जवळच्या लोकांना गमावलं, जागच्या जागी होरपळून ८ जण ठार झाले, तर २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नवरदेव हा या घटनेवर काहीही बोलत नाही, त्याचे अश्रू वाहण्याआधीच सुकले आहेत, अश्रू पुसायला, समजूत घालायला, सोबत रडायलाही कुणी नाही. ज्या जखमींचं निधन झालं, त्यांची अंत्ययात्रा निघते, प्रेतयात्रेत खांदा देणारा एक नवरदेव असतोच.

रोज दोन ते ३ प्रेत यात्रा, नवरदेव आता मनानंतर शरीरानेही थकलाय. पण हे चक्र अजून थांबत नाहीय. जयपूरमध्ये हॉर्सरायडिंगचं नवरदेव सांगसिंग काम करत होता.त्याला माहित नव्हतं लग्नाच्या बाबतीत त्याचं नशीब एवढं वाईट असेल.

या घटनेत आतापर्यंत ३५ लोकांचा जीव गेलाय. यापैकी १० जण हे बाहेरचे आहेत. बाहेरचे अनेक येतात, नवरदेवाला आधार देण्याचा प्रयत्न करतात, पण तो एकटक सर्वांकडे पाहत असतो.तो समजूच शकत नाहीय, नियतीने हा कोणता कठीण वार केला.

या घटनेत नवरदेवाने आई, पुतण्या, भाऊ यांना गमावलं, काहींनी आईवडील, काहींनी भाऊ बहिण तर काहींनी बहिणीला गमावलं.ही घटना ८ डिसेंबर २०२२ रोजी घडली. राजस्थानातील भुंगरा या गावात ही घटना घडली. जोधपूरपासून ११० किमीवर हे गाव आहे.

आतापर्यंत ११ दिवसात २५ अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण जीवनासाठी हा मोठा धक्का आहे, आतापर्यंत ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर गावातील मंडळी देखील या लग्नात सहभागी झाली होती.

या घटनेने काही अंगणातील किलबिल संपली, काहींना आजीआजोबा गेले, तर काही घरातील कर्ते पुरुष गेले, तर काहींच्या घरात कुणीच उरलं नाही. काहींचे आईबाबाच गेले. सिलिंडर ही प्रत्येक कार्य़क्रमात वापरली जाणारी वस्तू असली, तरी ती अधिक सुरक्षित आणि काळजी पूर्वक ठेवण्याची वस्तू आहे हे समजून घ्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.