फ्रान्सवरुन नॉनस्टॉप 7000 किमीचा प्रवास; हवेतच भरलं इंधन, आणखी 3 राफेल विमानं भारतात दाखल

काही तासांपूर्वी या विमानांनी फ्रान्समधून उड्डाण केले होते. त्यानंतर राफेल विमानांनी 7000 किलोमीटरचा पल्ला नॉनस्टॉप पार केला. | Rafale aircraft

फ्रान्सवरुन नॉनस्टॉप 7000 किमीचा प्रवास; हवेतच भरलं इंधन, आणखी 3 राफेल विमानं भारतात दाखल
यापूर्वी पाच विमानांची पहिली बॅच भारतात 28 जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 11:59 PM

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय वायूदलाच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे. फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली आणखी 3 राफेल विमानं (Rafale jet) बुधवारी रात्री भारतात दाखल झाली. (More firepower to IAF 3 Rafale fleet reached in India)

राफेल विमानांची ही तिसरी बॅच आहे. काही तासांपूर्वी या विमानांनी फ्रान्समधून उड्डाण केले होते. त्यानंतर राफेल विमानांनी 7000 किलोमीटरचा पल्ला नॉनस्टॉप पार केला. दरम्यानच्या काळात विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आले. हे इंधन भरण्यासाठी यूएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टॅकरसाठी वायूदलाकडून आभार मानण्यात आले आहेत.

यापूर्वी पाच विमानांची पहिली बॅच भारतात 28 जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती. भारताने फ्रान्सकडून एकूण 36राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण नऊ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. अशाप्रकारे पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत भारतीय वायूदलाच्या ताफ्यात 21 राफेल विमाने असतील.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर राफेल विमानांचं शक्तीप्रदर्शन

प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनावेळी राफेल विमानाकडून हवाई प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याचा वेग ताशी 900 किलोमीटर होता. याठिकाणी त्याने चार्ली स्टंटही केले, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

* राफेल हे 2 इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान * लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीनं राफेलची निर्मिती * हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता * हवेत 150 किलोमीटरपर्यंत तर हवेतून जमिनीवर 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अण्वस्त्रसज्ज राफेलची क्षमता

संबंधित बातम्या:

Republic Day: Republic Day: तब्बल 900KM वेग, राफेलचा थरार; तर ‘राम मंदिर’ प्रदर्शनानं टाळ्यांचा कडकडाट; जाणून घ्या सर्वकाही

Indian Air Force Day 2020 | भारताच्या ‘हवाई’ शक्तीचं प्रदर्शन, राफेलसह लढाऊ विमानांचा आकाशात थरार!

चोराच्या मनात चांदणं, राफेल भारतात दाखल होताच लाखो पाकिस्तान्यांची गूगलवर माहिती सर्च, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरही राफेलचीच चर्चा

(More firepower to IAF 3 Rafale fleet reached in India)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.