अरवाल : सध्या बिहारमध्ये जातीनुसार जनगणना करण्याचे काम सुरू आहे. या जनगणनेनिमित्ताने वेगवेगळी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ज्या प्रमाणे नवनवी माहिती समोर येत आहे, त्याच प्रमाणे काही वेळा धक्कादायक माहितीही समोर येत आहे. जात जनगणनेदरम्यान अरवल जिल्ह्यातील 40 महिलांच्या ‘पती’ एकच व्यक्ती असल्याचे या जनगणनेच्या निमित्ताने आढळून आले आहे. तर त्याचे नाव रूपचंद आहे. या नव्या माहितीमुळे आता जनगणना अधिकारीही आश्चर्यचकीत झाले आहेत.
नितीश सरकारकडून होत असलेल्या जात जनगणनेदरम्यान महिलांना त्यांच्या पतीची नावे विचारण्यात आली होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या 40 महिलांनी आपल्या पतीचे नाव रूपचंद असल्याचे सांगितले आहे.
ज्या चाळीस महिलांचा पती एकच असल्याचे सांगण्यात येत आहे. ते प्रकरण आहे अरवली नगर परिषद परिसरातील प्रभाग क्रमांक 7 चे आहे. हा रेड लाइट परिसर आहे. या भागात ती वर्षानुवर्षे सेक्स वर्कर म्हणून आयुष्य जगणाऱ्या ज्या स्रीया आहेत त्यांच्या आयुष्यातील हा प्रसंग आहे.
जातीनुसार जनगणनेचे काम सुरु असल्याने सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची माहिती गोळा करत आहेत. तर रेड लाईट एरियातून आकडेवारी गोळा करताना काही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
येथे 40 महिलांनी आपल्या पतीचे नाव रूपचंद असे नमूद केल्याचे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर काही महिलांनी पिता-पुत्र म्हणून रूपचंद असंच नावही सांगण्यात आले आहे.
अरवल रेड लाईट एरियातील सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्यांसमोर सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यांनी पती म्हणून नाव कुणाचे लावावे. येथे राहणाऱ्या बहुतांश स्त्रिया रूपचंद म्हणजेच रुपयाला आपले सर्वस्व मानतात. म्हणूनच त्यांनी पतीच्या नावासमोर रूपचंद असं नाव लावले आहे. तर कोणी वडिलांच्या नावासमोर रूपचंदच नाव लिहिले आहे.
जातीनुसार जनगणना करण्यासाठी आलेले शिक्षक राजीव रंजन राकेश हे सांगतात की, रेड लाईट एरियामध्ये राहणाऱ्या महिलांची माहिती घेताना त्यांनी काही नोंदी केल्या आहेत.
यावेळी महिलांनी आपल्या पती, वडील आणि मुलाचे नाव रूपचंद ठेवले. मात्र, रूपचंद कोण, याची माहिती गोळा केली असता, रूपचंद हा माणूस नसून, पैशालाच ‘रूपचंद’ म्हटले जाते असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळेच महिलांनी रूपचंद यांना आपला पती बनवल्याचेही त्यांनी सांगितले.