Jahangirpuri Violence : हिंसाचारानंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप; जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी आणखी 5 CRPF कंपन्या दिल्लीला रवाना
Jahangirpuri Violence : देशाची राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत गोंधळ झाला. मिरवणुकीत दोन्ही बाजू आमनेसामने आल्याने एकमेकांवर निशाणा साधत विटा आणि दगडांचा मारा करण्यात आला. तर दंगलखोर जमावाने पोलिसांनाही सोडले नाही. या घटनेत सहा पोलिसांसह एकूण सात जण जखमी झाले आहेत. तर या घटनेचे पडसाद आता अख्या देशात उमटत आहेत. जहांगीरपुरी हिंसाचारामुळे (Jahangirpuri violence) […]
Jahangirpuri Violence : देशाची राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत गोंधळ झाला. मिरवणुकीत दोन्ही बाजू आमनेसामने आल्याने एकमेकांवर निशाणा साधत विटा आणि दगडांचा मारा करण्यात आला. तर दंगलखोर जमावाने पोलिसांनाही सोडले नाही. या घटनेत सहा पोलिसांसह एकूण सात जण जखमी झाले आहेत. तर या घटनेचे पडसाद आता अख्या देशात उमटत आहेत. जहांगीरपुरी हिंसाचारामुळे (Jahangirpuri violence) देशात धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. तर याघटनेमुळे अख्या देशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट झाल्या आहेत. तर प्रत्येक राज्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांना (Police) रस्त्यावर उतरवले आहे. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तर जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी आणखी 5 CRPF कंपन्या दिल्लीला पाठवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील विविध भागात 500 जवान तैनात करण्यात येणार आहेत. सीआरपीएफ आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेत दिल्ली पोलिसांना सहकार्य करेल. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 2 आरएएफची कंपनी कालच तैनात करण्यात आली होती. त्यामुळे सध्या दिल्लीतील जहांगीरपुरी परिसराला पोलिस छावनिचे चित्र आले आहे. तर याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून 14 आरोपींना अटक केली आहे.
मिरवणुकीत गोंधळ
राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत गोंधळ झाला. त्यात गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. त्यात दिल्ली पोलिस उपनिरीक्षक मेधालाल मीना यांचाही समावेश आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिस उपनिरीक्षक मेधालाल मीना यांच्या हातात एक गोळी लागली होती. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबार करणार्याला अटक करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. तसेच त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. तर या दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावरील सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओंचा वापर करून आणखी संशयितांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तर हा गुन्हा दंगल, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखा आणि विशेष कक्षाच्या अधिकाऱ्यांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत.
भारत कमकुवत करायचा आहे
दरम्यान उत्तर-पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार हंस राज हंस जहांगीरपुरी हिंसाचारावर प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, मी सर्वांना शांतता आणि बंधुभाव राखण्याचे आवाहन करतो. प्रत्येक धर्मात काही वाईट घटक असतात. ते अशा घटनांना जबाबदार असतात. यामागे काही विदेशी शक्ती असू शकतात ज्यांना भारत कमकुवत करायचा आहे.
I appeal to all to maintain peace & brotherhood. There're some bad elements in every religion, they're responsible for such incidents. There could be some foreign powers behind this that want to weaken India: BJP MP from North-West Delhi, Hans Raj Hans on Jahangirpuri violence pic.twitter.com/SjeBm4RtFs
— ANI (@ANI) April 17, 2022
मिरवणूक संध्याकाळी गोंधळ
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराच्या सहा राऊंड्स झाल्या. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जहागीरपूरच्या परिसरातून सकाळी मिरवणूक शांततेत निघाली होती मात्र संध्याकाळी त्यात गोंधळ उडाला. सायंकाळी 5.40 वाजता काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ सुरू झाला. हीच वेळ आहे जेव्हा लोक इफ्तारच्या आधी नमाज अदा करायला मशिदीत जात होते. दरम्यान मशिदीसमोरच हाणामारी सुरू झाली. ही मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यात आले. मशिदीच्या आत भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोपही आहे. पण दुसरीकडे, दुसऱ्या बाजूने हे सगळे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. तर दुसरीकडे मिरवणुकीला ठिकठिकाणी लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले आहे.