विश्वासच बसत नाही… मोबाईल पाहत असताना पाच वर्षाच्या मुलीला अचानक हार्टॲटॅक; क्षणात होत्याचं नव्हतं…
तरूण वयातच अकस्मात हार्ट ॲटॅक येऊन मृत्यू होण्याच्या कित्येक घटना देशभरात ऐकायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यातच इंदूरमध्ये एका कोचिंग क्लासमध्ये बसलेल्या तरूणाला हार्ट ॲटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. तर त्यापूर्वी काही हिवस आधी ट्रेनमध्ये विंडो सीटला बसून गाणी ऐकणाऱ्या एका तरूणाचाही हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी अंत झाला. या सर्व घटना ताज्या असतानाच आता उत्तर प्रदेशमधून अतिशय हादरवणारी घटना समोर आली आहे.
लखनऊ | 22 जानेवारी 2024 : तरूण वयातच अकस्मात हार्ट ॲटॅक येऊन मृत्यू होण्याच्या कित्येक घटना देशभरात ऐकायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यातच इंदूरमध्ये एका कोचिंग क्लासमध्ये बसलेल्या तरूणाला हार्ट ॲटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. तर त्यापूर्वी काही हिवस आधी ट्रेनमध्ये विंडो सीटला बसून गाणी ऐकणाऱ्या एका तरूणाचाही हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी अंत झाला. या सर्व घटना ताज्या असतानाच आता उत्तर प्रदेशमधून अतिशय हादरवणारी घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे अवघ्या 5 वर्षांच्या मुलीला हार्ट ॲटॅक आल्याची दुर्दैवी घटना घडली. अवघ्या 5 वर्षांची ती चिमुरडी आईसोबत बसून मोबाईलवर कार्टून पहात होती. अचानक तिच्या हातातून मोबाईल खाली पडला ती देखील खाली कोसळली. तिथेच तिचा अंत झाला. घाबरलेल्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी तिला तातडीने गावातील डॉक्टरकडे नेले, पण तेथे तिला मृत घोषित करण्यात आलं. हार्ट ॲटॅक आल्यानेच तिचा मृत्यू झालावा असा अंदाज व्यक्त होत आहे. ही घटना हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावातील आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महेश खरगवंशी यांची 5 वर्षांची मुलगी कामिनी बेडवर बसली होती. ती आई सोनियासोबत मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि तो जमिनीवर पडला.
आधी तिची आई, सोनिया यांना वाटलं की कामिनी मुद्दाम असं करत आहे. पण ती उठली नाही, काहीच प्रतिक्रिया दिली नाही ते पाहून तिची आई हादरली. मुलगी उठत नाही बघून तिने हंबरडा फोडला तिचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि आसपासचे लोक लगेच तिथे पोहोचले. त्यांना तातडीने कामिनीला गावातील डॉक्टरांकडे नेले, पण तेथए तिला मृत घोषित करण्यात आलेय
लवकरच साजरा करणार होते पाचवा वाढदिवस
या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली होती. तिच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी तिचा मृतदेह गंगाघाटावर अंत्यसंस्कारासाठी नेला. कामिनी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. 30 जानेवारीला तिचा पाचवा वाढदिवस साजरा होणार होता.
तिच्या आईच्या सांगण्यानुसार, ती आणि कामिनी बेडवर बसून मोबाईलवर कार्टून पाहत होत्या. अचानक तिच्या हातातून मोबाईल निसटला. वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ती पूर्णपणे निरोगी होती. शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत खेळल्यानंतर त्यांनी जेवण केले, असे तिच्या आईने नमूद केले.
पोस्टमॉर्टमनंतरच कारण समजू शकलं असतं
याप्रकरणी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले की, ज्याप्रकारे घटनेची माहिती दिली जात आहे, त्यानुसार त्या मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला असू शकतो. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले असते. पण तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्यामुळे आता ते शक्य नाही. सध्या घरातील लोक जे सांगतात त्यावरच विश्वास ठेवता येईल.