50 टक्के भारतीय विनाकारण वारंवार मोबाईल फोन पाहातात, अहवालात झाला खुलासा
भारतात मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मोबाईल फोनचे रिल्स पाहण्यात भारतीयांचा वेळ प्रचंड वाया जात असतो. मोबाईलच्या वापराने मोठ्यांपासून लहानग्यांनाही वेड लावले आहे. आता मोबाईल फोनच्या वापराबाबत झालेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.
नवी दिल्ली | 12 फेब्रुवारी 2024 : मोबाईल फोन हा भारतीयांना सर्वात आवडती वस्तू बनला आहे. एका रिपोर्टनूसार प्रत्येक दोन पैकी एक ( 50 टक्के ) भारतीय युजर्स विनाकारण आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन उघडून पाहातो असा निष्कर्ष बाहेर आला आहे. ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टींग फर्म बोस्टन कंसल्टींग ग्रुप ( बीसीजी ) च्या अनुसार एक सर्वसामान्य युजर फोन करायचा नसला तरी दिवसातून 70-80 वेळा फोन हातात घेऊन स्क्रीन उघडून पाहात असतो असे अहवालात उघड झाले आहे.
50 टक्के युजर्सना हे माहीती नाही
आमच्या संशोधनात उघडकीस आले की 50 टक्के मोबाईल युजर्सना हे माहीती नसते की त्यांनी मोबाईल फोन का उचलून पाहीला आहे. या मागे त्यांना वारंवार फोन उचलून पाहण्याची सवय लागली आहे असे सेंटर फॉर कस्टमर इनसाईट्स इंडियाच्या प्रमुख कनिका सांघी यांनी म्हटले आहे. 1000 हून अधिक युजर्सच्या क्लीक / स्वॅप डाटा आणि संपूर्ण भारतात केले गेलेल्या कंज्यूमरच्या इंटरव्ह्यूवर आधारीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
स्मार्टफोनची संख्या वेगाने वाढतेय
45 -50 टक्के वेळा ग्राहकांना टास्क पूर्ण करण्यासंदर्भात संपूर्ण माहीती असते. आणि 5-10 टक्के प्रकरणात कंज्युमरना आंशिक स्पष्टता असते. बीसीजीच्या सिनियर पार्टनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर निमिषा जैन यांनी सांगितले की स्मार्ट फोनचा वापर वेगाने वाढत आहे. अलिकडेच मिडीया आणि इंडस्ट्री इव्हेंट्समध्ये ‘एआय ऑन डीव्हाईस’ किंवा ‘ऐप-लेस एक्सपिरियंस थ्रु जेन एआय’ सारख्या थीम्सवर चर्चा झाली आहे. जो त्या विकासाचे एक उदाहरण असल्याचे निमिषा जैन यांनी म्हटले आहे.
रिपोर्टमध्ये काय म्हटलेय
भारतीय स्मार्टफोन वापरकर्ते व्हिडिओ सामग्री ( लहान फॉर्म/लाँग फॉर्म ) स्ट्रीम करणे पसंद करतात. त्यांचा 50-55 टक्के वेळ स्ट्रीमिंग ॲप्स, सोशल चॅटींग (टेक्स्ट/कॉल),शॉपिंग, सर्चिंग ( ट्रॅव्हल,जॉब्स, छंद इ. याबाबत माहीती मिळविणे ) आणि गेमिंगवर खर्च होतो.