बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा

Union Budget 2019 नवी दिल्ली: अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांनी बंपर बजेट (Interim Budget 2019) सादर केलं. या बजेटमध्ये मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री ही सर्वात मोठी घोषणा केली. आरोग्य, तरुण, महिला, कामगार आणि शेतकरी यांच्यावर सरकारने लक्ष दिल्याचं दिसून येतं. शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना 2 […]

बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

Union Budget 2019 नवी दिल्ली: अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांनी बंपर बजेट (Interim Budget 2019) सादर केलं. या बजेटमध्ये मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री ही सर्वात मोठी घोषणा केली. आरोग्य, तरुण, महिला, कामगार आणि शेतकरी यांच्यावर सरकारने लक्ष दिल्याचं दिसून येतं. शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 6 हजार रुपये वार्षिक देण्यात येणार आहे. बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा

  1. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त 

मोदी सरकारने नोकरदारांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णता करमुक्त अर्थात टॅक्स फ्री केलं. यापूर्वी अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री होतं, ती मर्यादा आता 5 लाखांपर्यंत वाढवली आहे.  या घोषणेनंतर सभागृहात मोदी मोदीच्या घोषणा सुरु झाल्या. सरकारच्या करमुक्तीच्या घोषणेमुळे  80 C अंतर्गत 6.5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होईल.

6.5 लाख बचतीवर कोणताही आयकर नाही. नोकरदारांचं स्टॅण्डर्ड डिडक्शन 40 हजारावरुन 50 हजार

5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री या मोठ्या घोषणेमुळे नोकरदारांना सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. पियुष गोयल यांच्या या घोषणेनंतर संसद सभागृहात मोदी मोदीचा जयघोष सुरु झाला. 5 लाख आणि त्यामध्ये 80C अंतर्गत मिळणारी दीड लाखांची सूट यामुळे तब्बल 6.50 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असेल. या घोषणेमुळे जवळपास तीन कोटी मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2) शेतकरी

शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केले. 22 पिकांना हमीभाव निश्चित करण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. उत्पादन खर्चाच्या 50 टक्के आम्ही हमीभाव दिला. – पियुष गोयल

पंतप्रधान किसान योजना – शेतकऱ्यांना दरवर्षी  6 हजार रुपये मिळणार,  2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्यांना लाभ मिळणार, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार. 12 कोटी शेतक-यांना फायदा, यासाठी 75 हजार कोटी सरकार भरणार. तीन हप्यामध्ये पैसे मिळणार.  1 डिसेंबर 2018 म्हणजेच गेल्या महिन्यापासून लागू करणार. 

पाच एकरापर्यंत शेतक-यांना 500 रूपयांची मदत.  नैसर्गिक आपत्ती पिकाचं नुकसान झालेल्या कर्जात पाच टक्क्याची सूट

3) कामगारांसाठी

21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या असंघटीत नोकरदारांना 7 हजार रुपये बोनस

ईपीएफमध्ये सरकारचा वाटा वाढणार.

20 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युएटीवर कर लागणार नाही 20 लाखांपर्यंत ग्रॅच्युटीवर कर लागणार नाही. आतापर्यंत 10 लाखांची ग्रॅच्युटी करमुक्त होती, ती 20 लाखापर्यंत वाढवली

कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतर 6 लाखांपर्यंतची भरपाई

सैनिकांची पेन्शन दुप्पट, 3500 वरुन 7 हजार

60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार रुपये पेन्शन

10 कोटी मजुरांना फायदा

पंतप्रधान श्रमयोगी योजने अंतर्गत सरकारतर्फे 10 लाख कामगारांसाठी पेन्शन योजना. वयाच्या 18 वर्षी 55 रूपये तो भरेल बाकीचे पैसे सरकार भरेल.

4) सैनिकांसाठी

संरक्षणसाठीचं बजेट 3 लाख कोटी. गरज पडल्यास संरक्षणाचं बजेट वाढवणार

35 हजार कोटी वन रँक वन पेन्शनसाठी खर्च केले.

हाय रिस्क जवानांचे भत्तेही वाढवले

जवानांच्या मिलिट्री पे मध्येही वाढ करण्यात आली

5) टॅक्स

मध्यम वर्गाचा टॅक्स कमी करणं आमचं ध्येय

जीएसटी आतापर्यंतचा सर्वात क्रांतिकारी निर्णय, टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 80 टक्क्यांनी वाढली. करवसुली वाढली, सर्व पैसा गरिबांसाठी वापरणार

करवसुली 12 लाख कोटीपर्यंत गेली. टॅक्स रिटर्न्स भराऱ्यांची संख्या 6.85 कोटींवर पोहोचली. 99.54 टक्के टॅक्स रिटर्न्स जसेच्या तसे स्वीकारले. करवसुलीचा पैसा गरिबांसाठी वापरणार

नोटाबंदीमुळे 1 लाख 36 हजार कोटींचा टॅक्स वसूल झाला

6) तरुणांसाठी आणि महिला

भारतात खूप रोजगारांच्या संधी तयार झाल्या आहेत. मुद्रा योजने अंतर्गत 70 टक्के महिला लाभार्थी ठरल्या आहेत. मध्यम , लघु आकाराच्या उद्योगासाठी 1 कोटीचं कर्ज घेणाऱ्यांना 2 टक्क्यांची सूट. जीएसटी अंतर्गत त्यांनी नोंद केलेली असावी

देशामध्ये 100 शंभरहून अधिक एअरपोर्ट आहेत त्यामुळे तरूणांना या क्षेत्रात रोजगार मिळत आहे

महिलांसाठी काय?

उज्ज्वला योजने अंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन. मुद्रा योजने अंतर्गत 70 टक्के महिला लाभार्थी ठरल्या आहेत.

गर्भवती महिलांना 26 आठवड्याची पगारी सुट्टी

संबंधित बातम्या 

बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा  

संपूर्ण बजेट – Budget 2019 Live: बंपर बजेट! 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त  

साडे सहा लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री कसं होणार?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.