आंध्र प्रदेशातील फार्मा युनिटला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

हैदराबाद : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गुरुवारी मध्यरात्री एका फार्मासिटिकल युनिटला भीषण आग (fire broke) आलगल्याची घटना समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ही भीषण दुर्घटना गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. तर गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने […]

आंध्र प्रदेशातील फार्मा युनिटला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी
आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला आग Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 10:59 AM

हैदराबाद : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गुरुवारी मध्यरात्री एका फार्मासिटिकल युनिटला भीषण आग (fire broke) आलगल्याची घटना समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ही भीषण दुर्घटना गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. तर गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा संशय आहे. ही घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथे घडली. आग लागली तेव्हा फार्मासिटिकल युनिट 4 मध्ये 18 कामगार काम करत होते. लागलेली आग दोन तासांच्या प्रयत्नानंतरआटोक्यात आणण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी 4 जण हे बिहारमधील स्थलांतरित कामगार होते. आतापर्यंत 2 मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उदुरुपती कृष्णय्या, बी किरण कुमार, कारू रवी दास, मनोज कुमार, सुवास रवी दास आणि हबदास रवी दास अशी मृतांची नावे आहेत. यानंतर याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Chief Minister Jagan Mohan Reddy) यांनी दिले आहेत.

6 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला आग लागली. ही आग गुरुवारी मध्यरात्री कंपनीच्या युनिट 4 मध्ये लागली. जेव्हा तेथे 18 कामगार काम करत होते. या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. यानंतर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 5 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 2 लाख रूपये ही मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सखोल चौकशीचे आदेश

आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला लागलेल्या आगीचे कारण हे नेमके कळालेले नाही. मात्र ही आग गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने लागल्याचा संशय आहे. तर या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. ही घटना गंभीर असल्याने मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.