जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जम्मू बसस्थानकावरुन 7 किलो स्फोटकं जप्त
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. जम्मू बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.
श्रीनगर : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 2 वर्षे पूर्ण झाली आहे. अशावेळी आज जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. जम्मू बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयितालाही अटक केली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती संध्याकाळी 4.30 वाजता जम्मू झोनचे आयजीपी मुकेश सिंह पत्रकार परिषदेत देणार आहेत.(7 kg explosives seized from Jammu bus stand)
जम्मू-कश्मीर: जम्मू बस स्टैंड जहां से आज विस्फोटक सामग्री बरामद हुई। pic.twitter.com/wf4chWbMKM
— ANI_HindiNews (@AHindinews) February 14, 2021
दरम्यान, शनिवारी अनंतनाग पोलिसांनी सांबा परिसरातून दर रजिस्टंट फ्रन्ट (TRF)चा दहशतवादी जहूर अहमद राठेर याला अटक केली आहे. राठेरवर भाजपचे 3 कार्यकर्ते आणि एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येचा आरोप आहे. राठेरने POK मध्ये दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि राजौरी परिसरातून घुसखोरी करुन तो भारतात दाखल झाला होता. तो TRF मध्ये दहशतवाद्यांची भरती आणि शस्त्र पुरवठा करण्याचं काम पाहत होता. 2006 मध्ये त्यानं सरेंडर केलं होतं पण 2020 पासून त्यानं पुन्हा एकदा TRF साठी काम करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याला अटक करुन तपास सुरु केला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 2 वर्ष पूर्ण
2 वर्षापूर्वी 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये CRPFच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले होते. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CRPFच्या त्या 40 जवांना श्रद्धांजली अर्पण केली.
चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा दिवस कुणीही विसरु शकणार नाही, अशी भावना व्यक्त केली. आम्हाला आमच्या सुरक्षा रक्षकांवर गर्व आहे. त्यांची बहादुरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. देशाच्या सशस्त्र दलांना वारंवार हे सिद्ध करुन दाखवलं आहे की, ते देशाच्या रक्षणासाठी पूर्णपणे सक्षम आहेत, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
Development works that will help all sections of society. Watch from Chennai. https://t.co/b9QNo77Buw
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2021
संबंधित बातम्या :
पुलवामा हल्ला : 10 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
पाकिस्तानविरोधात एकत्र या, भारताचं जगाला जाहीर आवाहन
7 kg explosives seized from Jammu bus stand