आभाळानं पाहिलं अन् धरणीनं सहन केलं! 7 महिन्याचा चिमुरडा, मजुरांचं पोर ते…
7 महिन्याच्या चिमुरड्याला घरात एकटं कुठे ठेवणार? सोबत कामावर नेलं, चादर टाकून शेजारी झोपवलं, पण..
अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुरड्याचे रस्त्यावरील कुत्र्यांनी लचके तोडलेत. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात (Dog attacked) चिमुरडा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आलं. पण त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी (Baby boy killed in dog attacked) ठरलीय. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या नोएडमध्ये (Noida Dog Bite News) घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता देखील व्यक्त केली जातेय.
नेमकं काय घडलं?
नोएडातील सेक्टर 100 मधील लोटस बुलेवर्ड सोसायटीच्या आवारत ही दुर्दैवी घटना घडली. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मोकाट कुत्र्यांनी सात महिन्यांच्या चिमुरड्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका जबर होता, की चिमुरडा गंभीररीत्या त्यात जखमी झाला. चिमुरड्याच्या पोटाचे आतडेही कुत्र्यांनी आपल्या दाताने जखमी केले होते.
चिमुरड्याच्या किंकाळ्यांनी आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यावेळी त्यांना या घटनेचं गांभीर्य कळलं. मदतीसाठी धावलेल्या लोकांनी अखेर कुत्र्यांना पळवून लावलं. त्यानंतर मजुरीचं काम करत असलेल्या चिमुरड्याच्या आईवडिलांनाही याबाबत कळवलं. नंतर मुलाला घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मजुराचं पोर, दुर्दैवी अंत
मूळचे मध्यप्रदेशातील असलेलं हे दाम्पत्य नोएडामध्ये मजुरीचं काम करतं. नोएडामध्येच ते एका भाड्याच्या घरात राहत होते. लोटस सोसायटीत काम मिळाल्यानं ते तिथं आले होतं. नवरा बायको दोघंही आपल्या मुलासह सोमवारी आले. तिथेच काम करतेवेळी एक जागा पाहून त्यांनी आपल्या मुलाला चादर टाकून झोपवलं. त्यानंतर ते आपल्या मजुरीच्या कामाला लागले.
सात महिन्यांचा अरविंद झोपलेला असताना कुत्र्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर सात महिन्यांच्या चिमुरड्याचं शरीर सोलपटून निघालं होतं. त्यांच्या रडण्याचा आवाजही काळीज पिळवटून टाकणारा होता.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
मृत्यूशी झुंज अपयशी
रात्री उशिरापर्यंत अरविंदवर उपचार सुरु होते. पण रात्री 12 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चिमुरड्याचं शव मातापित्यांना सोपवलं. सोमवारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती.
नोएडामध्ये गेल्या काही काळात अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालीय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. अनेकदा याबाबत स्थानिक प्रशासनाला तक्रारही करण्यात आलीय. पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्यानं नाराजी व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे या घटनेनं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.